आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी, विटा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

विटा | चांगभलं वृत्तसेवा
आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी, विटा येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ७.१५ वाजता प्रमुख पाहुणे मा. डॉ. दादासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी कॅम्पस डायरेक्टर मा. पूजा पाटील, आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री. एन. एस. महाजन, आदर्श आयटीआयचे प्राचार्य श्री. व्ही. एम. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. दादासाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात एकता, शिस्त आणि समर्पण या मूल्यांच्या आधारे देश प्रगतीपथावर नेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना भारावून टाकले.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. स्वाती पाटील, सहायक प्राध्यापक, यांनी मान्यवर, शिक्षकवृंद, अशैक्षणिक कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
संपूर्ण कॅम्पस देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता, ज्यातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय मूल्यांची जोपासना करण्याचा संस्थेचा संकल्प दृढ झाल्याचे दिसून आले.