कराड: लाचखोर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकाला दोन वर्षांचा सश्रम कारावास! – changbhalanews
क्राइम

कराड: लाचखोर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकाला दोन वर्षांचा सश्रम कारावास!

कराड जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल!

कराड, दि. ६ | चांगभलं वृत्तसेवा

कराड जिल्हा व सत्र न्यायालयाने तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक भरत गोपाळ होळकर याला ७,००० रुपये लाच स्वीकारल्याबद्दल विविध कलमान्वये २ वर्ष सश्रम कारावास आणि १५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्याची हकीगत अशी, माजी पोलीस उपनिरीक्षक भरत गोपाळ होळकर (वय-६६, सेवानिवृत्त) याने २०१४ मध्ये फिर्यादीच्या तक्रारीच्या अहवालासाठी १०,००० रुपये लाच मागवली होती, ज्यापैकी ७,००० रुपये त्याने पंचासमक्ष दर्शन रेस्टॉरंटसमोर स्वीकारले होते.
या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात २१ जुलै २०१४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली पाटील यांनी करून, ३० डिसेंबर २०१४ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी कराड येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश श्री. डी.बी. पतंगे यांच्यासमोर झाली. या खटल्यात विशेष न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी खटल्यातील आरोपी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक भरत होळकर यास दोषी धरून विविध कलमान्वये दोन वर्ष सश्रम कारावास व एकूण पंधरा हजार रुपये दंड ठोठावला.

या खटल्यात सहा. जिल्हा सरकारी वकील श्री. एम.व्ही. कुलकर्णी व श्री. आर.डी. परमाज यांनी सरकार पक्षातर्फे युक्तीवाद केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे व उपअधीक्षक श्री. राजेश वाघमारे याच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली पाटील यांनी या या गुन्ह्याचा तपास केला होता.
या खटल्यात सरकार पक्षाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन अंकुश राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश विरकर या पैरवी अधिकारी व पैरवी अंमलदार यांनी सहकार्य केले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close