ब्रह्मदास विद्यालयात इनडोअर गेम्सचा सराव; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग – changbhalanews
शैक्षणिक

ब्रह्मदास विद्यालयात इनडोअर गेम्सचा सराव; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कराड प्रतिनिधी, दि. ५ | चांगभलं वृत्तसेवा
बेलवडे बुद्रुक येथील ब्रह्मदास विद्यालयात शारीरिक व मानसिक विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असतानाच, इनडोअर गेम्सच्या विशेष सराव सत्राला सध्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
कॅरम, बुद्धिबळ यांसारख्या इनडोअर खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम, निर्णयक्षमता, संघभावना व आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
मुख्याध्यापक जे. बी. माने व क्रीडा शिक्षक बी. डी. पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सराव सत्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवले जात असून, खेळातील नियम, प्रशिक्षण व रणनीती यावर भर दिला जात आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक क्षमताही वाढीस लागल्या असून, पालकवर्ग व परिसरातून याबाबत कौतुकाचे सूर उमटत आहेत.
शाळेच्या पातळीवरच विविध स्पर्धांची तयारी केली जात असून, विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात घडवण्याचे प्रयत्न वाखाणण्याजोगे ठरत आहेत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close