शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा; तत्वनिष्ठ राजकारणाची परंपरा जपणारा पक्ष – समीर देसाई

कराड, दि. ३ ऑगस्ट | चांगभलं वृत्तसेवा
शेतकरी, कामगार, शोषित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराड येथे साजरा करण्यात आला. २ ऑगस्ट १९४७ रोजी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे या पक्षाची स्थापना झाली होती.
या कार्यक्रमात सातारा जिल्हाध्यक्ष भाई अॅड. समीर देसाई यांनी भाषणात पक्षाच्या स्थापनेचा इतिहास आणि तत्त्वनिष्ठ वाटचालीची उजळणी केली. त्यांनी सांगितले की, “शेतकरी, शेतमजूर आणि समाजातील वंचित घटकांसाठी लढण्याचा ध्यास शेकापने कधीच सोडला नाही. गेल्या ७८ वर्षांत पक्षाने कधीही विचारसरणीशी तडजोड केली नाही.”
भाई गणपतराव देशमुख, एन. डी. पाटील सर, भाई केशवराव पवार, अॅड. भाऊसाहेब देसाई यांच्यासारख्या थोर नेत्यांनी पक्षासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले, अशी आठवण देसाई यांनी करून दिली.
या कार्यक्रमाला भाई एम. आर. जाधव, भाई दिनकरराव गुरव, अॅड. हैबतराव पवार, भाई युवराज मस्के, संपतराव जाधव, संभाजी जाधव आणि अॅड. अमित लाड हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाची ही सात दशकांहून अधिकची वाटचाल आजही विचारशील आणि तत्वनिष्ठ राजकारणासाठी प्रेरणादायी ठरत आहे.