कराड पोलिसांची ‘दबंग’ कामगिरी ! २४ तासांत घरफोडीचा पर्दाफाश – ९.५ तोळे सोने जप्त – changbhalanews
क्राइम

कराड पोलिसांची ‘दबंग’ कामगिरी ! २४ तासांत घरफोडीचा पर्दाफाश – ९.५ तोळे सोने जप्त

कराड प्रतिनिधी, दि. ११ जुलै २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहरात झालेल्या एका घरफोडीचा तपास केवळ २४ तासांत उघडकीस आणत, कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले आहे. या गुन्ह्यातून चोरीस गेलेले ९.५ तोळे वजनाचे, ५ लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, कराड उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली.

गुन्हा व तपासाची पार्श्वभूमी….

सोमवार पेठ, कराड (ता. कराड) येथील एका नागरिकाच्या घरात जानेवारी २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीत चोरी झाली होती. पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने लांबवले होते. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाची सूत्रे सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्या हाती देण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सतत तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक खबऱ्यांच्या आधारे संशयितांच्या मागावर होते.

संशयाच्या सुई दोघांच्याकडे वळली अन्...

तपासात संशयाची सुई ही
श्रेयस गणेश शिंदे (वय २२ वर्षे, रा. सोमवार पेठ, कराड)
अर्श शाहीद सुतार (वय २१ वर्षे, रा. शास्त्रीनगर, मलकापूर, ता. कराड)
या दोन तरुणांकडे वळली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेले ९.५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

जप्ती व अधिक तपास सुरू…

या कारवाईत एकूण ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून, आरोपींचा इतर गुन्ह्यांत सहभाग आहे का? याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांच्या तपास पथकाची जोरदार कामगिरी…

या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पथकामध्ये सहा. पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह सपोनि निलेश तारु,
पो.उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, हवालदार सज्जन जगताप, अनिल स्वामी, संदीप कुंभार, धीरज कोरडे, मोहसिन मोमीन, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, अमोल देशमुख, आनंदा जाधव, शैलेश साखरे, सोनाली पिसाळ यांचा समावेश होता. या पथकाने २४ तासात गुन्हा उघडकीस आणून दोन संशयितांना जेरबंद करून तब्बल ५ लाख ७० हजार रुपये किमतीचे साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करून जप्त केले. गुन्हे प्रकटीकरण शाखेने अलीकडच्या काळात केलेली ही मोठी ठरली आहे.

एक पाऊल पुढे – कराड पोलिसांची ठाम भूमिका…

कराड पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संघटित कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या प्रती विश्वास वाढला आहे. घरफोडीचे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखा सतर्क असल्याचा संदेशच या कारवाईतून शहर पोलिसांनी दिला आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close