लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दिलासा देणारी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जून महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया कालपासून सुरू करण्यात आली असून, आजपासून संबंधित लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे., अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे. यांनी ट्वीट करून दिली आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. महायुती सरकारच्या दृढ निश्चयातून, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.
राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत असून, यापुढेही ही योजना अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबवली जाणार असल्याचा विश्वास शासनाच्या वतीने मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.