कराड तालुक्यात सरपंच आरक्षणात 125 गावात महिलांना ‘लॉटरी’; इच्छुकांची समीकरणं बिघडली! – changbhalanews
राजकिय

कराड तालुक्यात सरपंच आरक्षणात 125 गावात महिलांना ‘लॉटरी’; इच्छुकांची समीकरणं बिघडली!

कराड प्रतिनिधी, दि. ४ | चांगभलं वृत्तसेवा
कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया आज दिनांक 4 जुलै 2025 रोजी सकाळी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, कराड येथे पार पडली. यावेळी संपूर्ण आरक्षण सोडत प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.
या आरक्षणात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते महिलांसाठी आरक्षित 125 गावे, ज्यामुळे अनेक जुन्या सरपंचांच्या योजना कोलमडल्या, त्यांची निराशा झाली तर तालुक्यातील ६० गावामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील जुन्या व नव्या चेहऱ्यांना सरपंचपदी संधी मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
सदर आरक्षण सोडतीत खालीलप्रमाणे वर्गवारीनुसार गावांमध्ये सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे:

🔷 अनुसूचित जाती (महिला) –13 गावे.

शिगणवाडी, माळवाडी, आणे, वाण्याचीवाडी, बेलवाडी, चोरजवाडी, विठोबाचीवाडी, घोणशी, भोसलेवाडी, वनवासमाची (स ग), पवारवाडी, आरेवाडी, मेरवेवाडी

🔷 अनुसूचित जाती – 12 गावे…
बाबरमाची, विठोबाचीवाडी, सयापूर, वराडे, नारायणवाडी, येवती, विरवडे, भोळेवाडी, शेळकेवाडी (म्हासोली), बामणवाडी, हवेलवाडी, हनूमानवाडी.

🔷 अनुसूचित जमाती (महिला) – 1 गाव
सुपने
🔷 नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – 27 गावे…
नडशी, राजमाची, कोरेगाव, शेनोली, सैदापूर, साकुर्डी, नांदगाव, कोपर्डे हवेली, कळंत्रेवाडी, कुसुर, मस्करवाडी, वसंतगड, चिंचणी, अंधारवाडी, लोहारवाडी, करजोशी, सावरघर, कालगाव, चरेगाव, कोनेगाव, कीरपे, कोळेवाडी, डिचोली मुनावळे, घोगाव, संजयनगर (शेरे), भुरभुशी, कोर्टी.

🔷 नागरिकांचा मागास प्रवर्ग – 27 गावे..
संजयनगर (काले), कोयनावसाहत, येळगाव, कोरीवळे, खराडे, खालकरवाडी, तुळसण, रेठरे खुर्ये, येरवळे, पाडळी केसे, वडगाव (उंब्रज), तासवडे, शिंदेवाडी (विंग), तळबीड, धनकवडी, मांगवाडी, करवडी, निगडी, नानेगाव, टेंभू, मरळी, कापील, पाचपुतेवाडी, हरपळवाडी, विंग, वाठार, आदर्शनगर.

🔷 सर्वसाधारण (महिला) – 61 गावे.
तारुख, वहगाव, चिखली, मसूर, शिरवडे, गोडवाडी, आकाईचीवाडी, मारुगडेवाडी, साबळवाडी, भरेवाडी, गोटेवाडी, शेवाळेवाडी (उंडाळे), बनवडी, मालखेड, कालवडे, कामथी, शेवाळेवाडी (महसुली), वडोली निलेश्वर, पोतले, गोळेश्वर, किवळ, जुळेवाडी, हिंदोली, कार्वे, शहापूर, जिंती, पाचुंद, शितळवाडी, यादववाडी, शेळकेवाडी (येवती), घोलपवाडी, खोडशी, हजारमाची, कालेटेक, बेलवडे बुद्रुक, जखिनवाडी, वस्ती साकुर्डी, काले, गोवारे, शामगाव, हणबरवाडी, पश्चिम सुपणे, मुनावळे, दुशेरे, गोंदी, उत्तर कोपर्डे (यादववाडी), नांदलापूर, बाबरमाची डिचोली, चचेगाव, सुर्ली, रेठरे बुद्रुक, मनू, उंब्रज, हेळगाव, गणेशवाडी, बानगुडेवाडी, धावरवाडी, यशवंतनगर, खोडजाईवाडी, कोडोली, सवादे

🔷 सर्वसाधारण (खुला) – 60 गावे
गायकवाडवाडी, वाघेश्वर, आंबवडे, अभयचीवाडी, खुबी, भूयाचीवाडी, अंतवडी, पेरले, वनवासमाची (खोडशी), ओंड, उत्तर तांबवे, चौरे, कचरेवाडी, वडगाव हवेली, भांबे, कासारशिरंबे, भवानवाडी, पिंपरी, पाडळी हेळगाव, साळशिरंबे, गोटे, घराळवाडी, केसे, लटकेवाडी, येनके, येणपे, अटके, काभीरवाडी, डेळेवाडी, मोहप्रे, वारुंजी, मुंडे, मासोली, शेरे, जुजारवाडी, हिंगणोळे, चौगुलेमळा, हनमंतवाडी, शिवडे, साजुर, धोंडेवाडी, ओंडोशी, कोळे, टाळगाव, गमेवाडी, गोसावेवाडी, वाघेरी, शिरगाव, बेलवडे हवेली, रिसवड, घारेवाडी, वानरवाडी, वडोली भिकेश्वर, बेलदरे, पार्ले, पाल, विजयनगर, तांबवे, जुने कवठे, नविन कवठे, उंडाळे.

 आरक्षण सोडत कार्यक्रमात उपस्थित अधिकारी:
श्रीमती वैशाली राजमाने (जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा), श्रीमती कल्पना ढवळे (तहसीलदार कराड), श्री बी.के. राठोड (निवासी नायब तहसीलदार), श्री महेश उबारे (महसूल नायब तहसीलदार), श्री हेमंत बेस्के (निवडणूक नायब तहसीलदार), श्री युवराज काटे व युवराज पाटील (सहा. महसूल अधिकारी), श्री राजेश सपकाळ, श्री आनंदराव पोळ, श्री सुनील काळेल, श्री प्रसाद देशपांडे, श्री सुरज लोकरे, श्री अभिजीत रावते तसेच 201 ग्रामपंचायतीमधील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close