पंढरीची वारी, सेवाभावाची साथ – मोफत तपासणी, औषधवाटप!

लोणंद | चांगभलं वृत्तसेवा
“जगात भारी पंढरीची वारी!” या भक्तिभावाने नटलेल्या पालखी सोहळ्यात समाजसेवेचा मंत्रही जपला गेला. इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम आणि इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ हिल्स यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच अरिस्ट आणि मॅग्नेशिया केमिकल्स यांच्या सहकार्याने संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त लोणंद येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये तब्बल ४०० वारकऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याशिवाय औषधांचे वाटप आणि खाऊचे वितरणही करण्यात आले.
या उपक्रमात इनरव्हील कराड संगमच्या डॉ. शैलजा कुलकर्णी, डॉ. सुवर्णा यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. अंबरनाथ हिल्स क्लबच्या पी.पी. स्वाती जगताप मॅडम, मॅग्नेशिया केमिकल्स व अरिस्टा केमिकल्सचे संचालक श्री. जगताप, कुलकर्णी सर आणि कर्मचारी वर्ग यांनी या उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले.
या सामाजिक सेवेसोबत भक्तिभाव जपत वारीचे आध्यात्मिक वातावरण अनुभवण्यासाठी क्लबच्या प्रमुख प्रे. सारिका शहा, सेक्रेटरी निमिषा गौर यांच्या पुढाकारातून कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या वेळी क्लब सदस्य छाया पवार, माहेश्वरी जाधव, श्रुती जोशी, सोनाली पाटील, सपना लुनिया, नंदा आवळकर, रतन शिंदे, सुकेशनी कांबळे, अनिता शुक्ला, जया सचदेव, मनीषा पाटील, विद्या शहा, शिवांजली पाटील, सारिका वेल्हाळ, आशा सावंत, मेघना चव्हाण यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.