राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांसाठी पुण्यात सुरू झालं ‘हेजिंग डेस्क’!

पुणे, दि. 27 जून | चांगभलं वृत्तसेवा
शेतमाल विकताना मिळणाऱ्या बदलत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणे ही नेहमीचीच चिंता आहे. यावर उपाय म्हणून ‘स्मार्ट प्रकल्पा’अंतर्गत महाराष्ट्र सरकारने पुणे येथे ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मका, कापूस आणि हळदीसारख्या पिकांसाठी बाजारात दर कमी झाला तरी एक निश्चित भाव मिळवता येणार आहे.
💡 ‘हेजिंग डेस्क’ म्हणजे नेमकं काय?…
‘हेजिंग’ म्हणजे पिकांच्या किमतीत पुढे घसरण झाली तरी त्यापासून संरक्षण. जसं घराचं दार आपल्याला बाहेरच्या धोकांपासून वाचवतं, तसं हे हेजिंग शेतकऱ्यांना बाजाराच्या धोक्यांपासून वाचवतं.
हेजिंगमुळे शेतकरी आधीच ‘वायदा बाजार’ (Future Market) किंवा ‘ऑप्शन ट्रेडिंग’द्वारे आपल्याला किमान किती पैसे मिळतील हे निश्चित करू शकतो. त्यामुळे भाव कितीही घसरला तरी शेतकऱ्याचं नुकसान होत नाही.
📍या पिकांना सुरुवातीला फायदा…
🌽 मका
🌿 हळद
👕 कापूस
यापुढे इतरही पिकांसाठी ही सुविधा लागू होणार आहे.
🔎‘हेजिंग डेस्क’ कसे काम करेल?….
शेतकऱ्यांना बाजारातील भावांची माहिती वेळेवर दिली जाईल.
शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) व संघटनांना प्रशिक्षण दिलं जाईल.
FPO व CBBO (Cluster-based organizations) यांना बाजारात कसे सहभागी व्हावे, याचे मार्गदर्शन दिले जाईल.
जवळपास ३,००० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना ‘कमोडिटी मार्केट’ मध्ये भाग घेण्यासाठी मदत केली जाईल.
मका, हळद आणि कापूस या पिकांबाबत दरवर्षी ‘जोखीम अहवाल’ तयार केला जाईल.
बाजारातील चढ-उतारावर आधारित ‘धोरणात्मक सल्ला’ दिला जाईल.
पिकांच्या साठवणीसाठी शेतकरी उत्पादक संघटनांना प्रोत्साहन दिलं जाईल.
🗺️ कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य?….
या उपक्रमाचा सर्वात मोठा लाभ मिळणार आहे:
हिंगोली
वाशिम
सांगली
यवतमाळ
अकोला
नांदेड
अमरावती
छत्रपती संभाजीनगर
बीड
या भागातील शेतकऱ्यांना अधिक मार्गदर्शन दिलं जाणार आहे.
🤝 सहकार्य कोणाचं?….
या उपक्रमात NCDEX (राष्ट्रीय कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज) आणि त्यांची प्रशिक्षण संस्था NICR यांनी महत्त्वाचे सहकार्य केले आहे. ८ एप्रिल २०२५ रोजी याबाबत करार झाला असून, पुण्यात मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.
📊 हेजिंगमुळे शेतकऱ्यांना काय फायदा?….
✅ बाजारात दर घसरले तरी नफा ठरलेला
✅ नुकसानाची शक्यता कमी
✅ स्थिर उत्पन्न मिळण्याची हमी
✅ शेतीमध्ये आत्मविश्वास
✅ भविष्यातील नियोजन शक्य
✅ शेतीत गुंतवणूक करण्यास प्रेरणा
🌾 शेती व्यवसायात सकारात्मक बदल घडवणारा प्रकल्प
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ‘स्मार्ट प्रकल्पा’च्या पहिल्या टप्प्यात पुणे येथे ‘हेजिंग डेस्क’ सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा करताना सांगितले की, हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेती व्यवस्थेत सकारात्मक बदल घडविणारा ठरेल.
📞 माहिती व संपर्कासाठी:
📍 कार्यालय: स्मार्ट प्रकल्प, पुणे
📞 संपर्क:
बाबासाहेब जेजुरकर – 9405002800
डॉ. ब्रम्हानंद देशमुख – 9561421509
नीरज शुक्ला – 9323614626
गौतम आठवले – 9420419470
निधि मिश्रा – 9029391806
📧 ईमेल: hedgingdesk.smart@gmail.com
🌐 वेबसाईट: https://www.ncdex.com (NCDEX वर अधिक माहिती आणि प्रशिक्षणासाठी तपासणी करा.)
📰 “आपल्या गावाची, आपल्या मनातली बातमी – फक्त चांगभलं न्यूजवर!”
📲 खालील प्लॅटफॉर्मवर आम्हाला Follow / Subscribe करा: 📷 Instagram ▶️ YouTube 🐦 X
📘 Facebook 🗞️ Dailyhunt
❤️ Like करा ↗️ शेअर करा 🔔 रहा अपडेट