दुचाकी वाहनांवर टोल लागू होणार नाही; गडकरी आणि NHAI कडून अफवांना ब्रेक – changbhalanews
Uncategorized

दुचाकी वाहनांवर टोल लागू होणार नाही; गडकरी आणि NHAI कडून अफवांना ब्रेक

नवी दिल्ली, २७ जून | चांगभलं वृत्तसेवा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी स्पष्ट केले आहे की दुचाकी (Two-wheeler) वाहनांवर टोल लावण्याचा कोणताही निर्णय किंवा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. काही प्रसारमाध्यमांकडून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत, ज्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

गडकरी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून जाहीर करताना म्हटले की, “दुचाकी वाहनांना टोलपासून संपूर्ण सूट कायम राहील. तथ्य न तपासता भ्रामक बातम्या पसरवणे ही निरोगी पत्रकारितेची ओळख नाही. मी याची तीव्र निंदा करतो.”

NHAI ने देखील इंग्रजीत पोस्ट करत सांगितले की, “टू-व्हीलर्सवर टोल लावण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही. हे #FakeNews आहे.”
सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे दुचाकीमालकांना दिलासा मिळाला आहे.

📰 आपल्या गावाची, आपल्या मनातली बातमी – फक्त चांगभलं न्यूजवर!
📲 आम्हाला येथे Follow करा 👉 📷 Instagram | ▶️ Youtube | 🐦 X | 🗞️ Dailyhunt
🔔 Subscribe करा, ❤️ Like द्या, ↗️ शेअर करा –     अपडेटसाठी सजग रहा!

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close