धाराशिव जिल्ह्यात बेरड-बेडर-रामोशी नोकरदार परिषदेत गुणवंतांचा व नवनोकरदारांचा सन्मान… – changbhalanews
Uncategorized

धाराशिव जिल्ह्यात बेरड-बेडर-रामोशी नोकरदार परिषदेत गुणवंतांचा व नवनोकरदारांचा सन्मान…

धाराशिव, दि. 23 | चांगभलं वृत्तसेवा
धाराशिव जिल्ह्यात रविवार, दि. २२ रोजी बेरड-बेडर-रामोशी आजी-माजी नोकरदार परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. या परिषदेमध्ये जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि शासकीय सेवेत नव्याने नियुक्त झालेल्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला.

या परिषदेत कॅप्टन अर्जुन लींगले,
संजय मदने, अ‍ॅडव्होकेट संतोष शिंदे, विष्णू मंडले (महावितरण), इतिहासतज्ज्ञ अनिल गुजले, प्रा. कु. अनिता मलबे, सहशिक्षक दत्तात्रय आगरखेड या प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.


🏅 या परिषदेत खालील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शासकीय सेवेतील नवनियुक्त अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला :
NMMS शिष्यवृत्तीधारक:
कु. आकांक्षा राम मंमाळे (वागदरी, इ. ८वी)
१०वी गुणवंत विद्यार्थी:
कु. संजना रमेश जमादार (नळवाडी) – ९७.००%
कु. तनूश्री दयानंद भोकले (भुसणीवाडी) – ९५.३०%
चि. गणेश प्रकाश भोसले (थोरलीवाडी) – ९५.२०%
कु. सपना युवराज जमादार (नळवाडी) – ९३.४०%
कु. सोनाली रणजित भोकले (भुसणीवाडी) – ९३.०७%


🎓 वैद्यकीय सेवा:
डॉ. अक्षय बाबूराव यंपाळे (कदमापूर) – BAMS विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
🏫 शैक्षणिक सेवा:
श्री. अंकुश मंडले (क्रीडा शिक्षक, तांबाळा, ता. निलंगा)
👮‍♂️ शासकीय सेवा – नव्यानियुक्त अधिकारी:
श्री. अनिल गोविंद वासुदेव (पुणे ग्रामीण पोलीस, भुसणीवाडी)
श्री. नेताजी व्यंकट वासुदेव (वन विभाग, मेढा, भुसणीवाडी)
श्री. नेताजी मारूती वासुदेव (स्वारगेट पोलीस ठाणे, भुसणीवाडी)
श्री. हणमंत विश्वनाथ वासुदेव (BSF, भुसणीवाडी)
श्री. शिवाजी शंकर भोसले (पोलीस, पुणे – कदमापुर)

सत्कारासोबत शैक्षणिक किट भेट :
सहा विद्यार्थीना सत्कारासोबतच नोकरदार परिषदेकडून प्रत्येकी एक किट देण्यात आले. एक काॅलेज बॅग, सहा रजिस्टर, पाच पेनाचे पाकीट, एक कंपास, एक पाणी बाॅटल, एक छत्री व रोख 500 रुपयांचा प्रत्येक किटमध्ये समावेश होता.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धाराशिव जिल्हा नोकरदार समितीने विशेष परिश्रम घेतले. परिषदेच्या यशामध्ये हातभार लावणाऱ्या सर्व समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close