ढेबेवाडी येथे एसटी बसचा अपघात, ३० जण जखमी – पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार तात्काळ उपचार सुरू – changbhalanews
क्राइम

ढेबेवाडी येथे एसटी बसचा अपघात, ३० जण जखमी – पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार तात्काळ उपचार सुरू

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
पाटण तालुक्यातील सळवे–ढेबेवाडी मार्गावर जानुगडेवाडी गावाजवळ आज सकाळी पाटण आगाराच्या एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात सुमारे ३० प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातानंतर जखमींना तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. यामध्ये ९ जणांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये, तर ९ जणांना ढेबेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित जखमींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाशी संपर्क साधून जखमींवर त्वरित व योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या आदेशानंतर पालकमंत्री देसाई यांचे विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील रुग्णालयात भेट देऊन उपचारांची माहिती घेतली व डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्व जखमी प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर असून धोक्याबाहेर आहे.

अपघाताच्या प्राथमिक तपासानुसार, बस चालकाने समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल वाहनाला चुकवण्यासाठी बस डावीकडे घेतली. त्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला बस आदळली आणि अपघात झाला. यामध्ये बसचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विजय पाटील, महसूल विभागाचे सर्कल अधिकारी यांनी भेट दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला असून जखमींना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close