इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या नेतृत्वाची नवी शान! सारिका शहा प्रेसिडेंट, निमिषा गौर सेक्रेटरी पदावर

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
सामाजिक बांधिलकीत अग्रगण्य असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या सन 2024-25 साठीच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये सारिका शहा यांची अध्यक्ष (प्रेसिडेंट) म्हणून, तर निमिषा गौर यांची सचिव (सेक्रेटरी) म्हणून निवड करण्यात आली आहे. या क्लबने यंदा आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवत बाराव्या वर्षात प्रवेश केला आहे.
नवीन कार्यकारिणीत पुढील पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे:
व्हाईस प्रेसिडेंट: माहेश्वरी जाधव
खजिनदार (ट्रेझरर): सोनाली पाटील
आय.एस.ओ.: श्रुती जोशी
संपादक (एडिटर): अंजना माने
सहसचिव (जॉइंट सेक्रेटरी): डॉ. शैलजा कुलकर्णी
कॉरस्पॉन्डिंग सेक्रेटरी (C.C.): सपना लूनिया
माजी अध्यक्षा (I.P.P.): अपूर्वा पाटणकर
एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये पुढील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे –
छाया पवार, सुषमा तिवारी, दिपाली लोहार, सारिका वेल्हाळ, मृणाल जोशी आणि अश्विनी भंडारे.
मेंबरशिप डेव्हलपमेंट ऑफिसर: रतन शिंदे आणि शिवांजली पाटील
जनसंपर्क अधिकारी (P.R.O.): पुष्पा चौधरी, तरुणा मोहिरे, विद्या पावसकर
या कार्यकालात क्लबकडून महिला सक्षमीकरण, बाल आरोग्य, युवा प्रशिक्षण, पर्यावरण संवर्धन, आणि सामाजिक जनजागृती यासारख्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचा हा नवा कार्यकारिणीचा ताफा निश्चितच समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाला आहे.