बांधकाम कामगारांच्या हक्कांचा नवा निर्धार! सिंधुदुर्गात कामगार महासंघाचे अधिवेशन उत्साहात पार – changbhalanews
Uncategorized

बांधकाम कामगारांच्या हक्कांचा नवा निर्धार! सिंधुदुर्गात कामगार महासंघाचे अधिवेशन उत्साहात पार

कणकवली | चांगभलं वृत्तसेवा
बांधकाम कामगार महासंघ, भारतीय मजदूर संघ संलग्नित चौथे त्रैवार्षिक प्रदेश अधिवेशन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान सभागृहात उत्साहात पार पडले. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाचे उद्घाटन झाले.

मी तुमचा हक्काचा माणूस आहे. कामगारांच्या न्यायासाठी मी सदैव तुमच्या सोबत उभा आहे,” अशी ठाम ग्वाही नामदार राणे यांनी देत संघटनेबद्दल आपुलकी व्यक्त केली.

या अधिवेशनात संघटनेचे मागील कार्यकाळातील अहवाल सादर करण्यात आले. सरचिटणीस श्री. संजय सुरोशे यांनी कामकाजाचा, तर कोषाध्यक्ष श्री. बाळकृष्ण कांबळे यांनी आर्थिक अहवाल सादर केला.

कामगारांसाठी महत्त्वाचे ठराव पारित

अधिवेशनात खालील प्रमुख ठराव पारित करण्यात आले:
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ९० दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र मिळावे.
पेन्शन योजनेत अधिकाधिक कामगारांचा सहभाग वाढवावा.
बांधकाम मंडळाचे पुनर्गठन करावे.
जिल्हास्तरावर तक्रार निवारण समित्या स्थापन कराव्यात.

नवीन कार्यकारिणी जाहीर :
अधिवेशनात आगामी त्रैवार्षिक कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली:
प्रदेश अध्यक्ष : हरी चव्हाण (फेरनिवड)
सरचिटणीस : रविंद्र माने (सातारा)
उपाध्यक्ष : रेश्मा शीलवंत (सातारा)
चिटणीस : लहूराज शिंगाडे (सातारा)
कोषाध्यक्ष : बाळकृष्ण कांबळे (ठाणे)
संघटनमंत्री : संजय सुरोशे (नांदेड)
कार्यकारिणी सदस्य : जयवंत शेटे (सातारा)
कार्यक्रमाचे सुंदर संचालन असंघटित क्षेत्र सहप्रभारी श्री. श्रीपाद कुटासकर यांनी केले. राज्यातील १४ जिल्ह्यांतील १००० पेक्षा अधिक बांधकाम कामगार प्रतिनिधी या अधिवेशनासाठी उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close