मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व इतर योजनांमध्ये सुधारणा

सातारा | चांगभलं वृत्तसेवा
राज्यातील शहरी व ग्रामिण क्षेत्रातील बेरोजगार युवक युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या संधी विचारात घेवुन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना जिल्हा उदयोग केंद्र, व महाराष्ट्र राजय खादी ग्रामोद्योग मंडळ सातारा कार्यालयामार्फत चालविण्यात येतात. या योजनेमध्ये लाभार्थीसाठी सर्वसाधारण अर्जदाराचे किमान वय १८ वर्ष पुर्ण तसेच तो इयत्ता ८ वी उत्तीर्ण असावा. यामध्ये वार्षिक उत्पन्नाची अट नाही. वैयक्तिक, भागीदारी, वित्तीय संस्था मान्यता दिलेले बचत गट, संस्था सोसायटी, स्वयंसहाय्यता बचत गट यांना नवीन उद्योगासाठीही योजना लागु आहे. कुटुंबातील एका व्यक्तीस पती किंवा पत्नी या पैकी एकास या योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थीने यापुर्वी राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या महामंडळाच्या या योजनेतुन लाभ घेतलेला नसावा. या योजनेमध्ये सर्वसाधारण प्रवर्गावसाठी कर्ज रक्कम ५० लक्ष व २० लक्ष सेवा उदयोग या रकमेवर देण्यात येणारे अनुदान पुढीलप्रमाणे स्व गुंतवणुक १० टक्के अनुदान, शहरी १० टक्के, ग्रामिण २५ टक्के व बँक कर्ज शहरी ७५ टक्के, ग्रामीण ६५ टक्के, विशेष प्रवर्ग अनु.जाती/जमाती / महिला / अपंग/ माजी सैनिक/इतर मागास प्रवर्ग, व्हि.जे. एन.टी कर्ज रक्कम ५० लक्ष उदयोग उत्पादन २० लक्ष सेवा उदयोग या रकमेवर देण्यात येणारे अनुदान – स्वगुतंवणुक ५ टक्के, अनुदान शहरी २५ टक्के ग्रामिण ३५ टक्के, बॅक कर्ज शहरी ७० टक्के ग्रामीण ६० टक्के या योजनेसाठी www.maha-cmegp.gov.in या वेबसाईटवर अर्ज करावा तसेच तसेच या कार्यालयात देखील ऑनलाईन अर्ज निशुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयातील अधिकृत कर्मचारी, अधिकारी याचेंशी संपर्क साधण्याचे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सातारा यांनी केले आहे.