अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने केली गरीब कुटुंबातील चार मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
बेलवडे हवेली ता. कराड जि. सातारा येथील गरीब कुटुंबातील चार मुलींना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्यावतीने ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे तसेच सतिश थोरात, तानाजी कचरे युवराज कचरे, जगन्नाथ कोकरे, सुनील कोकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली. प्रवीण काकडे यांच्या हस्ते सदर चारही मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश ट्रस्टच्यावतीने देण्यात आला.
बेलवडी हवेली ता. कराड येथील शिवानी बाळासाहेब दडस (बी फार्मसी सातारा), साक्षी बाळासाहेब दडस (बीएससी सद्गुरू गाडगे महाराज काॅलेज विद्यानगर), वैष्णवी सुनिल कचरे (इंजिनिअरिंग कॉलेज कराड ENTC), साक्षी जगन्नाथ कोकरे (बीबीएस सद्गगुरु गाडगे महाराज काॅलेज विद्यानगर) या चारही मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश शैक्षणिक कारणासाठी देण्यात आला.
ट्रस्टच्यावतीने आर्थिक मदत देण्यात येत असलेल्या चारही मुलींच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या या मुलींना शैक्षणिक कारणासाठी आर्थिक मदत करता यावी या हेतूने अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक ट्रस्टकडून त्यांना आर्थिक मदत दिल्याचे प्रवीण काकडे यांनी यावेळी सांगितले.