Uncategorized
धोंडीराम माळी यांचे निधन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती व मौजे मुंढे (साळवेमळा) ता.कराड येथील रहिवासी धोंडीराम आबा माळी यांचे सोमवार दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले.
त्यांच्या निधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे. मुंढे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, सर्व संचालक, सचिव, सभासद, भैरवनाथ सहकारी संस्था केसे, संगम सहकारी पाणीपुरवठा संस्था मुंढे-वनवासमाची या संस्थांचे पदाधिकारी व सभासद यांनी धोंडीराम माळी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.