सुनिलभाऊ तोरणे यांना राज्यस्तरीय लोकराजा शाहू कलारत्न पुरस्कार प्रदान

चांगभलं ऑनलाइन | इचलकरंजी प्रतिनिधी
घरनिकी गावचे होलार समाजाचे सुपुत्र व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) कलाकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनिलभाऊ भिमराव तोरणे यांना इचलकरंजी जि.कोल्हापूर येथे शाहू महोत्सवात मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू “कलारत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
शाहू महोत्सवाचे संकल्पक प्रमुख अरुण रंजना कांबळे, सेक्रेटरी सौ. अक्षरा अरुण कांबळे, नियोजन कमिटी अध्यक्षा सौ.मिनल कपिल राजहंस, माजी उपनगराध्यक्ष रविसाहेब रजपुते यांच्या हस्ते तोरणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. समारंभावेळी लहानपणापासून सोबत असलेला (अंध अपंग) दशरथ मोटे हा कलाकार व कुटुंबियांच्या उपस्थितीत तोरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सुनिल ऊर्फ सत्यवान भिमराव तोरणे हे घरनिकी ता.आटपाडी जि.सांगली गावचे सुपुत्र आहेत. आरपीआय आठवले पक्षाच्या कलाकार संघटनेचे ते सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. पोतराज कलावंत व हलगीपटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनिलभाऊ तोरणेंनी पारंपारिक लोककला भारतीय संस्कृती जतन करण्यासाठी बहुमुल्य योगदान दिले आहे. गायन, वादन नृत्य लोककलेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शिष्य तयार केले आहेत. व्यसनमुक्ती, समाज प्रबोधन व समाजकार्याची शिकवण देऊन कलाकारांना घडवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शाहू महोत्सव समितीने त्यांना “राज्यस्तरीय लोकराजा शाहू कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
👇 येथे पहा बातमीचा व्हिडिओ
दरम्यान, घरनिकी येथील समस्त होलार व बौद्ध समाज, सर्व ग्रामस्थ, कलाकार संघटनेचे सदस्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल सुनीलभाऊ तोरणे यांचे अभिनंदन केले आहे.