स्व.‌ यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपणारी आपली पुढची वाटचाल राहील – डॉ. अतुलबाबा भोसले – changbhalanews
राजकिय

स्व.‌ यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपणारी आपली पुढची वाटचाल राहील – डॉ. अतुलबाबा भोसले

स्मृतिदिनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा लाभला आहे. त्यांचा हा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपतच राजकारणातील माझी पुढील वाटचाल सुरु राहील, अशी ग्वाही कराड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ४० व्या पुण्यतिथिनिमित्त डॉ. भोसले यांनी कराड येथील प्रीतिसंगम घाटावर स्व. चव्हाण साहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रथमच भाजपाचे ‘कमळ’ फुलविणारे डॉ. अतुलबाबा भोसले हे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी डॉ. भोसले थेट विमानाने आज कराड येथे आले.

दुपारी १२ च्या सुमारास त्यांचे कराडच्या विमानतळावर आगमन झाले. यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारत डॉ. अतुलबाबा भोसले भव्य रॅलीने प्रीतिसंगम घाटावरील समाधीस्थळावर पोहचले. याठिकाणी त्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन, अभिवादन केले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. भोसले म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला स्वीकारले, याचा मला जास्तीत जास्त आनंद झाला आहे. माझ्यावरील जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून, जनतेने मला दिलेल्या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही सगळे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप चांगले काम केले आहे. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती व्हावी, महाराष्ट्राचा विकास व्हावा आणि देशातील एक प्रगतीशील राज्य बनवण्यासाठीचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून व्हावा, अशी माझी मनोमन इच्छा आहे.

कराडकरांचे माझ्यावर प्रेम आहे आणि या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. कराडकरांची सेवा करण्याची कराडकरांनी मला संधी दिली आणि त्यामुळे दिलेल्या संधीचे सोन करण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. या मतदारसंघातील प्रश्न भविष्यकाळात सोडवण्याच्या बाबतीत माझा प्रयत्न राहील, असे डॉ. भोसले म्हणाले.

यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, श्री. विनायक भोसले, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, श्रीरंग देसाई, दत्तात्रय देसाई, वसंतराव शिंदे, विनायक पावसकर, भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराडचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, माजी नगरसेवक सुहास जगताप, हणमंतराव पवार, अतुल शिंदे, महादेव पवार, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, माजी सभापती राजेंद्र यादव, माजी नगरसेवक दिनेश रैनाक, हणमंतराव जाधव, राजू मुल्ला, पैलवान आनंदराव मोहिते, सूरज शेवाळे, अजय पावसकर, प्रमोद शिंदे, दाजी जमाले, रमेश लवटे, माजी जि. प. सदस्या सौ. शामबाला घोडके, सौ. सारिका गावडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close