कराड शहर परिसरात भाजपा महायुतीच्या प्रचाराला वेग
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहर परिसरामध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचाराला वेग आला आहे. मंगळवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बूथ क्रमांक ११३,११४,११५ मधील लाहोटी हाऊसेस, रुक्मिणी विहार, रुक्मिणी विहार मागील सर्व परिसर, रणजीत नगर, अशोक विहार, शीला नगर, रुक्मिणी नगर भाग एक, भाग 2 , झोपडपट्टी या भागात कराड शहर भाजपचे पदाधिकारी, महायुतीचे शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी अशा सर्वांनी मिळून या भागात प्रचार रॅली काढून , पत्रके वाटून घर टू घर प्रचार केला. सुरुवातीस रुक्मिणी विहारमधील हनुमान मंदिर येथून नारळ वाढवून प्रचारास प्रारंभ करण्यात आला.
या प्रचारात भाजप शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, शहर सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, शिवसेनेचे रणजीत (नाना) पाटील, नगराध्यक्ष सौ. रोहिणीताई शिंदे, विश्वनाथ फुटाणे, कृष्णा चौगुले, सौ. मंजिरी कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष राहुल आवटे, मुकुंद चरेगावकर, सचिव
सुनील नाकोड, सौ. सोनल नाकोड, राजेन्द्र खोत, बांधकाम व्यवसायिक रवी शिंदे व कार्यकर्ते, अजय संसुद्दी, रमेश मोहिते, सौ.स्वाती मोहिते, सौ. गौरी निलाखे, सौ. मोहिते मॅडम, भाजप प्रदेश सदस्या सौ. स्वाती पिसाळ, डॉ. शैला कुलकर्णी, मोहिनी कलबुर्गी, विशाल साळुंखे सर , राहुल टकले, सुहास जोशी, मंथन शेंडे, अमिष शिरगावकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते .
परिवर्तन अटळ असल्याचे दिसतेय – एकनाथ बागडी
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विशेषतः कराड शहर व परिसरात महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या निवडणूक प्रचारासाठी प्रभावीपणे यंत्रणा राबवली आहे. अनेक कार्यकर्ते दिवस-रात्र परिश्रम घेऊन उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी महायुतीच्या माध्यमातून केलेली विकास कामे व डॉ. अतुलबाबा यांचे व्हिजन मतदारांच्या समोर ठेवत आहेत. कार्यकर्त्यांच्या या प्रचाराला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यामुळे मतदार संघात परिवर्तन अटळ आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांनी मतदारांशी बोलताना व्यक्त केली.