राजकिय
259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र मागे नाही
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशनपत्रे माघारी घेण्याचा आज पहिला दिवस होता.कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आज एकाही उमेदवारांने आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले नाही.27 उमेदवारांची 30 नामनिर्देशनपत्रे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आज दिनांक 31 ऑक्टोबरपर्यंत प्रविष्ट आहेत.अशी माहिती 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे,लालासाहेब गावडे व डॉक्टर जस्मिन शेख यांनी दिली आहे.