कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 7 पक्ष तर 15 अपक्षांचे आजवर अर्ज दाखल ; उद्या छाननी
चांगभलं ऑनलाइन | कराड : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करणेचे कामकाज 22 ऑक्टोबर रोजीपासून सुरु झाले असून काल अखेर 13 उमेदवारांनी 16 नामनिर्देशन पत्र दाखल होते, आज दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी 9 उमेदवार यांनी 12 नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत, त्यामुळे आज अखेर एकूण 22 उमेदवार यांनी 28 नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत अशी माहिती 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, नायब तहसीलदार हेमंत बेसके यांनी दिली.
अधिक माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले की, आज दिनांक 29 ऑक्टोबर 2024 अखेर 22 उमेदवारांनी 28 नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून 2 उमेदवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे 1 उमेदवार, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (A) 1 उमेदवार, वंचित बहुजन आघाडी कडून 1 उमेदवार, बहुजन समाज पार्टी कडून 1 उमेदवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 1 उमेदवार व अपक्ष उमेदवार 15, इतक्या उमेदवार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत. दाखल नामनिर्देशन पत्राची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, कराड येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता होणार आहे.
दरम्यान, 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आज अखेर नामनिर्देशन पत्रे दाखल झालेली नावे पुढील प्रमाणे:
अतुल सुरेश भोसले – (भारतीय जनता पार्टी)
सुरेश जयवंतराव भोसले – (भारतीय जनता पार्टी)
पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण – (इंडियन नॅशनल काँग्रेस)
इंद्रजित अशोक गुजर – (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
विद्याधर कृष्णा गायकवाड – (बहुजन समाज पार्टी)
संजय कोंडीबा गाडे – (वंचित बहुजन आघाडी)
मुकुंद निवृती माने – (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A))
गोरख गणपती शिंदे – (अपक्ष)
विश्वजीत अशोक पाटील – (अपक्ष)
रविंद्र वसंतराव यादव – (अपक्ष)
गणेश शिवाजी कापसे – (अपक्ष)
ऋषिकेश विजय जाधव – (अपक्ष)
हमीद रहीम शेख – (अपक्ष)
प्रशांत रघुनाथ कदम – (अपक्ष)
प्रकाश यशवंत पाटील – (अपक्ष)
महेश राजकुमार जिरंगे – (अपक्ष)
विजय नथुराम सोनावले – (अपक्ष)
शमा रहीम शेख – (अपक्ष)
शैलेंद्र नामदेव शेवाळे – (अपक्ष)
चंद्रकांत भिमराव पवार – (अपक्ष)
जनार्दन जयवंत देसाई – (अपक्ष)
सुवर्णसिंह शंकरराव पाटील – (अपक्ष)