कराड उत्तरमध्ये परिवर्तन अटळ ; विकासासाठी कराड उत्तरची जनता मनोजदादा घोरपडेंच्या पाठीशी राहणार – चंद्रकांत मदने – changbhalanews
राजकिय

कराड उत्तरमध्ये परिवर्तन अटळ ; विकासासाठी कराड उत्तरची जनता मनोजदादा घोरपडेंच्या पाठीशी राहणार – चंद्रकांत मदने

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा दुष्काळ आहे. गावगाड्यातील आणि वाड्यावस्त्यावरील जनता ही विकासकामांच्या प्रतीक्षेत आहे. हे काम मनोजदादा घोरपडे हेच पूर्ण करू शकतील, असा विश्वास असल्याने कराड उत्तरची जनता ही मनोजदादा घोरपडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे, असे मत कराड पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत मदने यांनी व्यक्त केले.

ओगलेवाडी ता‌. कराड येथील राजवर्धन मंगल कार्यालयामध्ये हजारमाची गणातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे कराड उत्तर निवडणूक प्रभारी मनोजदादा घोरपडे, महेशबाबा जाधव, प्रकाश पवार, शिवाजी डुबल, विनोद डुबल, मनोज माने, अनिल पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत मदने म्हणाले, कराड उत्तर मध्ये परिवर्तनाचे वारे वाहत असून मनोजदादांच्या रूपाने 2024 ला नवीन आमदार मिळणार आहे. मनोजदादांनी गेली बारा वर्षे कराड उत्तर मध्ये चांगल्या पद्धतीचे काम केले असून यावेळी त्यांना त्याचे गिफ्ट म्हणून आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे. त्यासाठी आपण सर्व मावळ्यांनी एक दिलाने त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करूया.

यावेळी खरेदी विक्री संघांचे संचालक प्रकाश पवार म्हणाले , मनोजदादा यांचे सर्व समावेशक नेतृत्व आहे. कराड उत्तरमध्ये ते सातत्याने काम करत आहेत. अशा नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागावे.
यावेळी संभाजी कुंभार, अमोल माने, अरुण डुबल, बैलगाडी कमिटीचे अध्यक्ष उदय पाटील, माजी उपसरपंच सतीश पवार, पै. अतुल पवार, माजी सरपंच कुमार इंगळे, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पवार, राजू सूर्यवंशी, राकेश बनसोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव पाटील, अमोल पाटणकर, महेश जिरगे, बापू गांदले, निलेश डुबल, विरवडे गावचे उपसरपंच प्रफुल्ल वीर, माजी उपसरपंच सागर हाके, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सर्जेराव बनसोडे, बुरुड समाजाचे पश्चिम महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष विजयराव साळुंखे, विरवडेचे माजी सरपंच जावेद मुजावर, मन्सुर इनामदार , समीर मुजावर, अमर कांबळे, प्रसाद धोकटे, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय जोशी, मनोज वीर, संदीप लोंढे, विकास सेवा सोसायटी माजी चेअरमन मोहनराव जाधव, पांडुरंग जाधव, कराप्पा पवार, वनवासमाची गावचे ग्रामपंचायत सदस्य मनोज माने, ग्रामपंचायत सदस्य अधिक पाटील, शरद आडके, गोरख आडके, विशाल कुंभार, पांडुरंग माने, पार्ले गावचे युवा नेते तुकाराम नलावडे, संदीप मदने, आदी मान्यवर उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close