ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने १६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन केलं सन्मानित
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली या संघटनेच्या पिंपरी चिंचवड शाखेत येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात १६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी भोसरी पुणे येथील आमदार महेश लांडगे यांचा सत्कार करताना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे , माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप, यांचे बंधू शंकरशेठ जगताप, व्याख्याते शरद करणवर, प्रा. डॉ. विठोबा तळे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुनील शेंडगे , हनुमंतराव दुधाळ , माजी नगरसेवक राजू दुर्गे, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन वाघमोडे , अरुण पाडुळे, सुर्यकांत गोफणे, अंकुश भांडं, मुकुंद कुचेकर , व्यंकटराव वाघमोडे, मधुकर लबाते, सौ. विना सोलवनकर, संतोष वाघमोडे , महेंद्र दडस, आशा काळे , अजय दुधभाते, उद्योगपती नाना शिंदे, रेखा दुधभाते, काळुराम कवितके, डॉ सोमनाथ सलगर, डॉ भानुदास कुलाळ, गोविंद वलेकर, मधुकर लबाते , प्रतिभा काळे, राजु धायगुडे, अजित चौगुले, सदाशिव पडळकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक महावीर काळे यांनी केले तर आभार यशोदा नायकवडी (अध्यक्षा युवती आघाडी) यांनी मानले सौ सोना गडदे अध्यक्षा महिला आघाडी, हिराकात गाडेकर अध्यक्ष युवक आघाडी, सुनील बनसोडे अध्यक्ष मराठवाडा विभाग, नवनाथ देवकाते, संजय नायकवडी जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा, बाळासाहेब कारंडे, संजय कवितके , सौ पल्लवी मारकड, संतोष पांढरे अध्यक्ष, सचिन शिंदे, रोहिदास पोटे, दादा दोलताडे , बाळासाहेब यमगर, रणजित गोरड, शिवाजी गलांडे , अशोक शेंडगे, काका मारकड, समाधान सोनवलकर, सतिश पाटील, सचिन कोपनर, सुरेखा जानकर, सौ नंदा करे व विद्यार्थी उपस्थित होते.