श्री धानाई देवी, पाचवडेश्वर, श्री धुळोबा देवस्थानाच्या विकास कामांसाठी खा. उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून 75 लाखांचा निधी मंजूर
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड दक्षिणमधील विविध गावांमधील ‘ब’ वर्ग दर्जाच्या देवस्थान परिसरातील तीर्थक्षेत्र विकासकामांना ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन आदेश पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने नुकताच जारी करण्यात आला आहे.
कराड दक्षिणमधील विविध गावांमध्ये सुप्रसिद्ध मंदिरे असून, या ठिकाणी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. या भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी, या तीर्थस्थळांच्या विकास होणे गरजेचे आहे. यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत निधी मंजूर व्हावा, या मागणीसाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले यांचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरु होता. याप्रश्नी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ना. गिरीश महाजन यांना पत्रव्यवहार करुन, या निधीसाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कराड दक्षिणमधील विविध गावांमधील ‘ब’ वर्ग दर्जाच्या देवस्थान परिसरातील तीर्थक्षेत्र विकासकामांना ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये कार्वे येथील श्री धानाई मंदिर येथे पेव्हर ब्लॉक, अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटर बांधकाम करणे (२५ लाख), पाचवडेश्वर येथील श्री महादेव मंदिर येथे पेव्हर ब्लॉक, अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटर बांधकाम करणे (१० लाख), घारेवाडी येथील श्री धुळोबा देवस्थान येथे पेव्हर ब्लॉक, अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटर बांधकाम करणे (१० लाख), रेठरे खुर्द येथील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिर येथे पेव्हर ब्लॉक, अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटर बांधकाम करणे (१० लाख), रेठरे बुद्रुक येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर व श्री शंभू महादेव मंदिर येथे पेव्हर ब्लॉक, अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटर बांधकाम करणे (१० लाख), आटके येथील श्री संत मुकुंद महाराज मंदिर व श्री हटकेश्वर महादेव मंदिर येथे पेव्हर ब्लॉक, अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटर बांधकाम करणे (१० लाख) असा एकूण ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीच्या माध्यमातून याठिकाणी लवकरच विकासकामांना प्रारंभ केला जाणार आहे. ज्याचा लाभ भाविकांना व ग्रामस्थांना होणार आहे. या निधीबद्दल ग्रामस्थांमधून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले यांचे आभार मानले जात आहेत.