कराड दक्षिणसाठी राज्य सरकारकडून आणखी २४.२० कोटींचा निधी ; डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश – changbhalanews
राजकियराज्य

कराड दक्षिणसाठी राज्य सरकारकडून आणखी २४.२० कोटींचा निधी ; डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश

राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात निधीस मंजुरी

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
: राज्यातील महायुती सरकारकडून कराड दक्षिणवर निधीची अक्षरश: बरसात सुरु आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे मंगळवारी (ता. ९) कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी ९६.५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमंजुरीला २४ तास उलटत नाहीत, तोपर्यंत डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी २४.२० कोटींचा निधी महायुती सरकारकडून मंजूर झाला आहे. या निधीमधून कराड दक्षिणमधील अनेक गावांमध्ये रस्ते विकासाची कामे केली जाणार आहेत. यामुळे ग्रामीण दळणवळणाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

कराड दक्षिणमधील विविध रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर करावा, याबाबत डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्नशील होते. त्यानुसार त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार केला होता. तसेच वेळेवेळी या निधीबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत अर्थमंत्री ना. पवार यांनी पुरवणी अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या कामांचा समावेश करुन, या विकासकामांसाठी तब्बल २४ कोटी २० लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

या विकासकामांमध्ये कराड दक्षिणमधील येळगाव हरिजन वस्ती जोड रस्ता ग्रा.मा. २९२ कि.मी. ०/०० ते ०/३०० ची सुधारणा करणे (३० लक्ष), ढेबेवाडी प्रजिमा ५५ ते चचेगाव रस्ता ग्रा.मा. १७१ कि.मी. ०/०० ते ३/५०० ची सुधारणा करणे (५० लक्ष), शेणोली ते अकलाई मंदिर रस्ता ग्रा.मा. २२२ कि.मी. ०/०० ते १/५०० ची सुधारणा करणे (५० लक्ष), थोरात मळा ते ओंड – ओंडोशी रस्ता ग्रा.मा. २४६ कि.मी. ०/०० ते ०/६०० ची सुधारणा करणे (५० लक्ष), कराड – कापील – कोडोली इजिमा ११९ कि.मी. ०/०० ते २/०० ची (कोडोली हद्दीतील जितेंद्र बबन मोहिते दुकान ते भीमराव विठू जगताप घरापर्यंत) ची सुधारणा करणे (१ कोटी), जखिणवाडी ते रा.मा. ४ ते गोळेश्वर रस्ता ग्रा.मा. १९६ कि.मी. ०/०० ते २/५०० ची सुधारणा करणे (१ कोटी), कोळे जोड रस्ता ग्रा.मा. १६० कि.मी. ०/०० ते १/६०० ची सुधारणा करणे (१ कोटी), रा.मा. ४ ते कापील रस्ता ग्रा.मा. १८९ कि.मी. ०/०० ते ०/५०० ची सुधारणा करणे (१ कोटी), कणसेवाडी ते विंग रस्ता ग्रा.मा. १९८ कि.मी. ०/०० ते १/५०० ची सुधारणा करणे (१ कोटी), मालखेड – बेलवडे बुद्रुक रस्ता इजिमा १२४ कि.मी. ०/०० ते १/०० (भाग- रा.मा. ४ ते मालखेड) ची सुधारणा करणे (१ कोटी ५० लक्ष), प्रजिमा ५५ ते शिंदेवाडी (विंग) रस्ता ग्रा.मा. २०१ कि.मी. ०/०० ते ३/५०० ची सुधारणा करणे (१ कोटी ५० लक्ष), कासारशिरंबे ते कालवडे रस्ता ग्रा.मा. २८७ कि.मी. ०/०० ते ३/०० ची रस्ता सुधारणा करणे (१ कोटी ८० लक्ष), काले जुने स्टँड ते स्मशानभूमी ते देसाई मळा ते रा.मा. १४८ रस्ता ग्रा.मा. २३८ कि.मी. ०/०० ते ३/०० (भाग काले ते प्रजिमा ६२) ची सुधारणा करणे (२ कोटी), प्रजिमा ५५ ते घारेवाडी तलाव ते धुळेश्वर देवस्थान रस्ता ग्रा.मा. २०२ कि.मी. ०/०० ते ३/०० (भाग प्रजिमा ५५ ते घारेवाडी) ची सुधारणा करणे (२ कोटी १० लक्ष), शेरे ते रा.मा. १४२ वाल्मिकी पाणंद रस्ता ग्रा.मा. २२५ कि.मी. ०/०० ते ३/५०० ची सुधारणा करणे (२ कोटी ५० लक्ष), राष्ट्रीय महामार्ग ४ ते खोडशी ग्रा.मा. १०९ कि.मी. ०/०० ते १/०० ची सुधारणा करणे व लहान पुलाचे बांधकाम करणे (६ कोटी) अशा एकूण २४ कोटी २० लक्ष रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कराड दक्षिणमधील या महत्वपूर्ण कामांना मंजुरी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. तसेच हा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close