पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातील अडचणी सोडवणार ; मनोज घोरपडे
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
रहिमतपूर येथील जंगम मठ येथे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तहसील कार्यालय कोरेगाव व मनोजदादा युवा मंच यांच्यावतीने कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सदर कॅम्पचे उद्घाटन भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, संपतदादा माने, चित्रलेखा माने कदम, वासुदेव माने, भीमरावकाका पाटील, तहसीलदार संग्राम कोंडे, कृषी अधिकारी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी बोलताना मनोज घोरपडे म्हणाले, कराड उत्तर मधील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधीचे हप्ते येण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. ज्या शेतकऱ्यांना हप्ते येत होते परंतु आत्ता येत नाहीत, किंवा ज्यांना आजपर्यंत आलेले नाहीत अशा सर्वांच्या अडचणी सोडवून त्यांना पीएम किसानचे हप्ते कसे मिळतील यासाठी आमची यंत्रणा काम करणार आहे. आजच्या कॅम्पसाठी शेतकरी बांधव, माता भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.
तसेच भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहणार असून लाडकी बहिणी योजनाही मतदार संघातील प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी त्याचे कॅम्प आयोजित केले जातील.
आज आपण बारमाही मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवत असतो. एक फोन केला तरी त्या व्यक्तीला मोती बिंदूचे ऑपरेशन मोफत करून दिले जाते. माता-भगिनींसाठी आटा चक्की तसेच शेतकऱ्यांसाठी शेती औषध फवारणी पंप वाटप कायम चालू असते.
पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांना इंग्लिश, सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमामध्ये ऑनलाइन एज्युकेशन लर्निंग ॲप देण्याची सुविधा चालू आहे.
पीएम सन्माननीधीचा कॅम्प आज रहिमतपूर येथे आयोजित केलेला आहे. काही दिवसांमध्ये वाठार, पुसेसावळी, कोपर्डी हवेली, मसूर,उंब्रज, पाल, नागठाणे, याही ठिकाणी पी एम सन्नमान निधीचे कॅम्प लावण्यात येतील.
या कॅम्पला सचिन बेलागडे, राजेश घाडगे , जयंत माने सर, दुशांतराजे शिंदे, तात्या साबळे, रणजीत माने, आनंत माने, नेताजी भोसले, शेखरअण्णा माने, विष्णुपंत कणसे, गणेश भोसले, शंकर भोसले, सतीश लवंगारे, गणेश घोरपडे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव, माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.