कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यामुळे थांबले नागरिकांचे हेलपाटे
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड हा तालुका जिल्ह्यातील विविध क्षेत्रात अग्रगण्य गणला जातो. तालुक्यातील महत्त्वाचा असलेला महसूल विभाग अनेक प्रकल्प व शासकीय योजना राबविण्यात नेहमीच अग्रेसर असून यामध्ये कराड नगरपालिकेची भूमिका महत्त्वाची मानली जाते. जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या येथील नगरपालिकेच्या अकाउंट विभागातील लेखापाल हे पद काही काळासाठी रिक्त होते. त्यामुळे काही काळासाठी इतर कर्मचाऱ्यांकडे या पदाचा चार्ज दिला गेला होता. त्यामुळे येथील कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत होते.
मात्र फेब्रुवारी २०२४ मध्ये या पदाचा कार्यभार मयूर नंदलाल शर्मा यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी अनेक रचनात्मक बदल करत कारभारात सुधारणा केली. संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना करत कार्यालयीन कामकाजात शिस्त लागू केली. येथील कामासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. मात्र शर्मा यांनी कार्यभार सांभाळला व नागरिकांची कामे तातडीने मार्गी लागू लागली आहेत. शहर व परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
भविष्यात कराड नगरपालिकेच्या अकाऊंट विभागात मयूर शर्मा यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी अमुलाग्र बदल घडवून आणतील असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.