रामदास आठवलेंची मंत्रीपदाची हॅट्रिक! विटा-खानापूरात आरपीआय कार्यकर्त्यांनी पेढे वाटले
चांगभलं ऑनलाइन | विटा
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा कॅबिनेट प्रभारी राज्यमंत्री म्हणून शपथ घेत मंत्रिपदाची हॅट्रिक केली. या आनंदाच्या प्रित्यर्थ विटा शहरातील आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या मार्गदर्शनाखाली व खानापूर तालुका अध्यक्ष नवनीत लोंढे व कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल तोरणे यांच्या नेतृत्वाखाली हलगी, ढोल, ताशा वाजवत जिलेबी, लाडू व पेढे वाटून, फटाक्यांची आतिषबाजी करत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महीला आघाडी महाराष्ट्र सहसचिव अलकाताई भंडारे, वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. तुषार लोंढे, कलाकार संघटना जिल्हाध्यक्ष सुनील तोरणे, मुस्लिम आघाडी खानापूर तालुका कार्याध्यक्ष ईसाक पिरजादे, महिला खानापूर तालुकाध्यक्षा निकिता लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, खानापूर तालुका उपाध्यक्ष सुरेश कांबळे, उपाध्यक्ष शरद घाडगे , उपाध्यक्ष गणेश लोखंडे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष गणेश पवार, मुस्लिम आघाडी तालुकाध्यक्ष बशीर भाई मुजावर, आटपाडी शहराध्यक्ष शशिकांत मोटे, युवा नेते मारुती ढोबळे, नितीन तोरणे, कलाकार संघटना सांगोला तालुका अध्यक्ष सुभाष मदने यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.