राज्यातील 449 सहाय्यकांना (सपोनि) पोलीस निरीक्षकपदी बढती – changbhalanews
Uncategorized

राज्यातील 449 सहाय्यकांना (सपोनि) पोलीस निरीक्षकपदी बढती

सातारा पोलीस दलातील 'इतकेजण' झाले 'इन्स्पेक्टर'

चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज एक आदेश काढून राज्यातील विविध ठिकाणी पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या तब्बल 449 जणांना पोलीस निरीक्षक पदावर बढती दिली आहे. त्यामध्ये सातारा पोलीस दलातील 9 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. त्यांची पदोन्नतीने पोलीस निरीक्षक पदावर विविध ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

पदोन्नती मिळालेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये साताऱ्यातील 9 जणांचा समावेश आहे. त्यांची नावे व कंसात पदोन्नतीने पोलीस निरीक्षक पदावर बदली झालेले ठिकाण पुढील प्रमाणे ; संतोष वसंत तासगावकर (पो. प्र. केंद्र सोलापूर), राजकुमार पंढरीनाथ भुजबळ (पो. प्र. केंद्र नानवीज) , विठ्ठल अरुण शेलार (जि. जा. प्र. त. स.सातारा) , रोहित धन्यकुमार दिवसे (रा. गु. वि.), वैभव श्रीरंग पवार (गोंदिया), नवनाथ विभीषण रानगट (मुंबई शहर), शैलजा सर्जेराव पाटील (महाराष्ट्र सायबर), अमित शिवाजी शितोळे (मुंबई शहर), सरोजिनी विलास पाटील (मुंबई शहर).

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close