इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या प्रेसिडेंटपदी अपूर्वा पाटणकर तर सेक्रेटरीपदी सारिका शहा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या सन 2024 – 25 साठीच्या कार्यकारिणीमध्ये प्रेसिडेंटपदी अपूर्वा पाटणकर यांची तर सेक्रेटरीपदी सारिका शहा यांची निवड करण्यात आली. क्लबने यावर्षी अकराव्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे. आपल्या विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे क्लबने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
क्लबची नवनियुक्त कार्यकारणी अशी ; व्हॉइस प्रेसिडेंट – छाया पवार , ट्रेझरर – दिपाली लोहार, आय. एस. ओ.- सारिका वेल्हाळ, जॉईट सेक्रेटरी – सुषमा तिवारी, सी.सी.- विद्या शहा, एडिटर – निमिषा गोर ,आय. पी. पी.- तरुणा मोहिरे.
एक्झिक्युटिव्ह कमिटी मध्ये- पुष्पा चौधरी ,डॉ. शैलजा कुलकर्णी, नंदा आवळकर, आशा सावंत , सुकेशनी कांबळे, अनिता शुक्ला यांची निवड करण्यात आली. मेंबर शिप डेव्हलपमेंट ऑफिसर्स- श्रुती जोशी , माहेश्वरी जाधव, अंजना माने , पी. आर. ओ. पदी रतन शिंदे , शिवांजली पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षात महिला सक्षमीकरणावर भर…
या वर्षामध्ये महिला सक्षमीकरण अंतर्गत महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन तसेच व्यवसायासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्लब विशेष प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन व शाळेतील मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येतील. आई व मुलांमधील सुसंवाद जोपासण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांना व्यासपीठ मिळावे म्हणून महिला महोत्सव, आदर्श माता व जिजाऊ पुरस्कार असे विविध उपक्रम क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.
इनरव्हील इंटरनॅशनलचे हे एकशे एकवे वर्ष आहे. इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन शोभना पालेकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार वर्षभर क्लबचे कामकाज उत्तमरीत्या चालवण्याचा मानस आहे .
– प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर व सेक्रेटरी सारिका शहा
“चांगभलं” या साप्ताहिकामुळं गेल्या पन्नास वर्षांत कोणताही संबंध न राहिलेल्या माझ्या जन्मगावाशी, “कराडशी”, पुन्हा ऋणानुबंध जोडला गेलाय! त्यासाठी मी आपला शतशः ऋणी आहे!
जर शक्य असेल तर, कराडच्या शैक्षणिक,
सामाजिक आणि क्रीडाक्षेत्रातील बातम्या जर आपण प्रसिद्ध करु शकलात तर अतिशय आनंद होईल!
“पन्नास वर्षांपूर्वीचं कराड कसं होतं?” यासंदर्भात जर काही लिखाण जर आपण प्रसिद्ध करणार असाल तर, “असं होतं आपलं कराड!” अशा शिर्षकाच्या खाली,
दर आठवड्याला एक छोटीशी ( १०० शब्दात!) लेखमाला लिहिण्याची माझी इच्छा आहे!
सर, आपला फोन नंबर मला पाठवा. मी आपल्याशी सविस्तर बोलेन.