कराडला झाल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कै.सु.ल.गद्रे यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब ऑफ कराड ने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते. संगम हेल्थ क्लब यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून स्पर्धक आले होते. सकाळी 8.30 वाजता सुरू झालेली ही स्पर्धा दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होती. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यामधून प्रचंड प्रतिसाद मिळाला. संगम हेल्थ क्लबचे मुरली सर आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन संगम उद्योग समूहाचे प्रमुख मा. श्री बाळासाहेब कुलकर्णी आणि रोटरी क्लब ऑफ कराड चे अध्यक्ष बद्रीनाथ धस्के यांच्या हस्ते झाले.
एकूण चार प्रकारांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक गटामध्ये बेस्ट स्विमर चे पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धे च्या बक्षीस वितरण समारंभ दी कराड अर्बन बँकेचे सीईओ श्री. दिलीप गुरव आणि त्यांच्या पत्नी सौ. जयश्री गुरव,नाना खामकर,तसेच इनरहिल क्लब ऑफ कराड संगम च्या अध्यक्षा तरुणा मोहिरे, सचिव छाया पवार, वृषाली पाटणकर, रतन पाटील, अनिता शुक्ला, नंदा अवळकर व रोटरीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष बद्रीनाथ धस्के, सेक्रेटरी शिवराज माने, किरण जाधव, रामचंद्र लाखोळे, विकास देसाई, विनायक राऊत, डॉ राहुल फासे,डॉ शेखर कोग्नुळकर, डॉ भास्कर जाधव, चंद्रशेखर पाटील, जगदीश वाघ, आनंदा थोरात, राजगोंडा अपीने, डॉ भाग्यश्री पाटील, प्रबोध पुरोहित आणि चंद्रकुमार डांगे उपस्थित होते.