सेवा भारती कडून चिकुर्डे शिवसंकल्प प्रतिष्ठानला वैद्यकीय उपकरणे प्रदान
डॉ. संजय कुलकर्णी यांचा पुढाकार, प्रतिष्ठानच्या कार्याला पाठबळ, हजारो पीडितांना होणार लाभ
चांगभलं ऑनलाइन | इस्लामपूर प्रतिनिधी
आपल्या चिकुर्डे गावचे सुपुत्र डॉ.संजय कुलकर्णी अथक प्रयत्नातून सेवा भारती सांगली यांच्या सौजन्याने आपल्या गावच्या शिवसंकल्प प्रतिष्ठान, चिकुर्डे या सामाजिक संस्थेला मोफत वैद्यकीय उपकरणे संस्थेसाठी प्रदान करण्यात आली.
या उपकरणांचा फायदा गावतील सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना होत आहे गेल्या दोन वर्षात शेकडो लोकांनी याचा मोफत फायदा घेतला आहे. प्रतिष्ठानच्यावतीने ऑक्सिजन मशीन , बेड, कमोड चेअर व्हील चेअर हवेच्या गाद्या स्टिक्स कुबड्या वाकर ॲम्बुलन्स यास अनेक सेवा पुरवल्या जात आहे. यावेळी डॉक्टर संजय कुलकर्णी म्हणाले की या प्रतिष्ठानचे काम अत्यंत उत्कृष्ट सुरू आहे कामामध्ये सातत्य आहे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून प्रत्येकाने समाजाकडून काहीतरी घेत असताना समाजासाठी काहीतरी दिले पाहिजे या देण्याने समाजामध्ये एक सामाजिक भावना निर्माण होऊन एकमेकांमध्ये आदर निर्माण होतो व यातूनच सशक्त राष्ट्र निर्मिती होते.
यावेळी सेवा भारती चे अध्यक्ष डॉ.संजय कुलकर्णी सर,उपाध्यक्ष श्री.अभिजीत द्रविड़ , राजन गोखले ,श्रीधर जोशी, श्रीपाद करंदीकर, नारायण जोशी, उद्योजक कृष्णात भोसले, शिवसंकल्प चे अध्यक्ष शहाजी पाटील, उपाध्यक्ष युवराज यादव, सचिव शरद स्वामी, वारणा कारखान्यात संचालक श्रीनिवास डोईजड, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, उत्तम पाटील कोंडीबा अनुसे , तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दौलत पवार, चंद्रपूरचे गटविकास अधिकारी प्रदीप पांढरबळे, उद्योजक उमाजी पाटील, विठ्ठल मलगुंडे, सुरेंद्र पाटील, अमर ठोंबरे, राजाराम पाटील शिवाजी पाटील अजित पाटील, यास अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक शहाजी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शरद स्वामी यांनी तर आभार प्रदीप पांढरबळे यांनी मानले.