नामदेवराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कराडला काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा – changbhalanews
राज्य

नामदेवराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कराडला काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील (आप्पा) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (मंगळवारी) दिनांक २८ मे २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता हॉटेल सत्यजित विट्स, वारुंजी फाटा, कराड येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली आहे.

या स्नेहमेळाव्यास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील यांची सुद्धा विशेष उपस्थिती या स्नेहमेळाव्यास असणार आहे.

लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली असून काँग्रेस कार्यकर्त्यांशी या अनुषंगाने संवाद साधण्याच्या उद्देशाने तसेच पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील (आप्पा) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वारुंजी जि‌. प. गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी या मेळाव्यास सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मनोहर शिंदे यांनी केले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close