Uncategorized
कराड पंचायत समितीच्या माजी सदस्य सुरेखा पाटील यांचे निधन
चांगभलं ऑनलाइन| कराड प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषदेच्या आणि कराड पंचायत समितीच्या माजी सदस्या सुपने (ता. कराड) येथील सौ सुरेखा महेंद्र पाटील (वय ५७) यांचे आज पहाटे हदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पती, दोन मुली, एक मुलगा, सासू, सासरे असा परिवार आहे. उद्योजक महेंद्र पाटील यांच्या पत्नी तर माळशिसरचे माजी आमदार शामराव पाटील यांच्या त्या कन्या होत. रक्षा विसर्जन विधी गुरुवारी (ता. १६) सकाळी नऊ वाजता सुपने येथील जुन्या गावठाणातील स्मशानभुमीत होईल.