कराड दक्षिण मतदार संघात चार संवेदनशील मतदान केंद्रे ; 186 मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच
कराड उत्तर मतदार संघात 339 मतदान केंद्र ; विक्रांत चव्हाण व अतुल म्हेत्रे यांची माहिती

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
45 सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात चार मतदान केंद्रांवर संवेदनशील (critical ) मतदान केंद्र म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे, तर 313 मतदान केंद्रापैकी 186 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही व व्हिडिओ शूटिंग कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे., अशी माहिती 260 करोड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या समवेत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार स्मिता पवार उपस्थित होत्या. दरम्यान, २५९ उत्तर कराड विधानसभा मतदार संघ निवडणूक कार्यालयाचे कामकाज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउददेशीय हॉल, कराड येथे सुरु आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये ३३९ मतदार केंद्र आहेत. नोंदणीकृत मतदारांची संख्या २९६९४५ इतकी आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली. यावेळी तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पवार उपस्थित होते.
45 सातारा लोकसभा मतदार संघ अंतर्गत 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची तयारी अंतिम टप्यात आलेली आहे. 45 सातारा लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे आहेत. तसेच 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे हे आहेत. व अतिरिक्त सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार स्मिता पवार या कार्यरत आहेत.
260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतदार संख्या याप्रमाणे –
पुरुष मतदार – 154666, स्त्री मतदार -147887 , इतर 27 ,
एकूण 302580, सैनिक मतदार 658 आहेत.
तसेच 309 मतदान केंद्र आहेत व 4 सहाययकारी मतदान केंद्र आहेत असे एकूण 313 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान केंद्रावर 309 BLO कार्यरत आहेत.
दिनांक 07/05/2024 रोजी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे आणि मतदांनाची टक्केवारी वाढवी याकरीता वेगवेगळ्या मतदान केंद्राची रचना करणेत आलेली आहे.
मतदान केंद्रांची रचना –
1. महिला मतदान केंद्र 94 सैदापूर व 136 कराड
2. युवा मतदान केंद्र :- 104 कराड व 177 मलकापूर
3. अव्दितीय मतदान केंद्र 121 कराड
4. दिव्यांगव्दारा संचलित मतदान केंद्रः 108 कराड
5. क्रिटीकल मतदान केंद्र (ASD आधारे): 59 सवादे, 211 काले, 228 नांदगांव , 305 शिवनगर (रेठरे बु.)
एकूण 313 मतदान केंद्रावर 348 केद्राध्यक्ष, 348 सहा. केंद्राध्यक्ष, 767 इतर मतदान अधिकारी, 343 शिपाई, 20 Micro Observer व 8 Quick Response Team इत्यादी अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. 186 मतदान केंद्राचे Web Casting व्दारे Video shooting
करणेत येणार आहे. वरील अधिकारी कर्मचारी याची यापूर्वी 2 प्रशिक्षण घेणेत आलेली आहेत तसेच दिनांक 06/05/2024 रोजी रत्नागिरी शासकीय धान्य गोदाम कराड येथे 3 रे प्रशिक्षण घेणेत येणार आहे.
सुसज्ज पोलीस यंत्रणा….
सदर पूर्ण मतदान प्रक्रिया सुरक्षा कामी 1 पोलीस उपअधिक्षक, 1 पोलीस निरीक्षक 14 सहा. पोलीस निरीक्षक, 201 पोलीस कर्मचारी व 112 होमगार्ड केंद्रीय सशस्त्र पोलीस दल 1 तुकडी, राज्य सशस्त्र पोलीस दल 1 तुकडी, सशस्त्र रक्षक 1 तुकडी,
४५-सातारा लोकसभा निवडणूक- २५९कराड उत्तर मतदार संघाची निवडणूक तयारी पुर्ण
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी सातारा लोकसभा मतदार संघ अंतर्गत २५९ कराड उत्तर मतदार संघामध्ये प्रशासनाची तयारी सुरु आहे. २५९ उत्तर कराड विधानसभा मतदार संघ निवडणूक कार्यालयाचे कामकाज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउददेशीय हॉल, कराड येथे सुरु आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये ३३९ मतदार केंद्र आहेत. नोंदणीकृत मतदारांची संख्या २९६९४५ इतकी आहे. निवडणूक प्रक्रीया राबविण्याकरीता मतदान केंद्रांवर एकूण २५०४ कर्मचारी आवश्यक आहेत. स्थानिक महिला कर्मचारी वगळता उर्वरीत कर्मचारी जिल्हयातील इतर तालुक्यातून येणार आहेत. कर्मचा-यांना पहिले प्रशिक्षण दि. ०६ व ०७ एप्रिल २०२४ रोजी समर्थ मल्टीपर्पज हॉल, गजानन सोसायटी येथे झाले आहे. दुसरे प्रशिक्षण दि. २६ व २७ एप्रील २०२४ रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, सैदापूर कराड येथे घेण्यात आले. गृह मतदानाकरीता संमती दिलेले ८५ वर्षाच्या वरील वृध्द मतदारांची संख्या २६६ इतकी आहे, दिव्यांग मतदारांची संख्या ३२ इतकी असून त्यांचे टपाली मतदान मतदारचे घरी जावून दि. ०१ मे ते ०४ मे कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. त्याकरीता मतदारसंघामध्ये एकुण राखील १० मतदान पथके तयार करण्यात आलेली आहेत. या प्रक्रीयेवर लक्ष ठेवण्याकरीता १० मायक्रो ऑब्जरवर व व्हिडीओग्राफर, पोलीस यांची नियुक्ती केली आहे. मतदार संघामध्ये कराड-विटा रोड, कराड पुसेसावळीरोड शामगाव, तासवडे टोल नाका, रहिमतपूर वाठार किरोली रोड, कराड विटा रोड चोराडे फाटा या ५ ठिकाणी ६ स्थिर निगराणी पथके कार्यरत आहेत. सदर पथकांनी दि. १२.०४.२०२४ ते ३०.०४.२०२४ या कालावधीत ३०७२४ एवढी वाहने तपासली आहेत. तसेच या मतदार संघामध्ये ५ भरारी पथक कार्यरत आहेत. मतदान प्रक्रीयेकरीता ईव्हीएम यंत्र तयार करण्याची प्रक्रीया दि. २९ व ३० एप्रिल २०२४ रोजी पुर्ण करण्यात आली आहे. मतदार संघामध्ये आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु असून आतापर्यंत C Vigil App वर तीन किरकोळ स्वरुपाच्या तीन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत कार्यवाही करण्यात येवून तक्रारींचे निराकरण वेळेत करण्यात आलेले आहे. स्वीप कक्षाकडून मतदारसंघामध्ये जास्ती जास्त मतदान होणेकरीता मानवी साखळी, पथनाटय, सेल्फी पॉईंट, स्वाक्षरी माहिम, विविध पोस्टर्स व बॅनर्सव्दारे आतापर्यंत २६ गावात जनजागृती करण्यात आली आहे.
२५९ कराड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयातील विविध पथकांच्या कामकाजाबाबत दि. १४.०४.२०२४ रोजी निवडणूक खर्च निरीक्षक श्री. कुमार उदय यांनी भेट देवून आढावा बैठक घेतली असून त्यांनी निवडणूकीकरीता नेमण्यात आलेल्या कर्मचा-यांकडून कामाचा आढावा घेवून मार्गदर्शन केले आहे.
दि. २२.०४.२०२४ रोजी निवडणूक निरीक्षक-कायदा व सुव्यवस्था (आ.पी.एस.) श्री. प्रदीप शर्मा यांनी निवडणूक कार्यालयास तसेच स्ट्राँग रुमला भेट दिली, तेथील पाहणी करुन त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी काले, कराड शहरातील जि. प. प्राथमिक शाळा क्र. ७ व १२ येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. दि. २४.०४.२०२४ रोजी निवडणूक निरीक्षक आर. अर्जुन (आय.ए.एस.) यांनी निवडणूक कार्यालयास भेट देवून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.
निवडणूक प्रक्रीया सुरळीतपणे पुर्ण होणेकरीता जिल्हाधिकारी तथा ४५ सातारा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज असल्याची माहिती २५९ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली.