विरोधकांकडे आजही पंतप्रधानपदाचा चेहरा नाही – उदयनराजे भोसले
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
विरोधकाकडे पंतप्रधान पदाचा अजून चेहरा ठरला नाही, आणि ही निवडणूक सरपंचपदाची नसून देशाचा पंतप्रधान ठरवण्यासाठीची निवडणूक आहे, असे प्रतिपादन श्नी. छ. खा. उदयनराजे भोसले यांनी केले.
तांबवे फाटा साकुर्डी पेठ येथील जय भवानी कार्यालयात सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, सुनिल काटकर, जयवंत शेलार ,भरत पाटील, लक्ष्मण देसाई, हणमंतराव चव्हाण, शिवाजी गायकवाड, उपसरपंच विश्वास कणसे, प्रदीप पाटील, प्रभाकर देसाई, अशोक माने, प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे भोसले म्हणाले, केंद्र सरकारने निती आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भरभरून विकास निधी दिलेला आहे. हा पाटण विभाग डोंगरी विभाग आहे, या डोंगरी विभागांमध्ये सुद्धा नामदार शंभूराजे देसाई यांनी विकास कामातून या भागाचा कायापालट केलेला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून यापुढेही विकास कामासाठी मी कमी पडणार नाही असेही उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
शंभूराजे देसाई म्हणाले , मोदी सरकार हे प्रगतीच्या दिशेने काम करणारे सरकार आहे. ही निवडणूक ही देशाचे नेतृत्व कुणी करावं ही ठरवणारी निवडणूक आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सातारा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना उच्चांकी मतांनी निवडून पाठवा.
यावेळी प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी केले व आभार हिंमतराव थोरात यांनी मानले.
स्वर्गीय विलासकाकांनी मोबाईल वापरला नाही पण माणसं जोडून ठेवली!
सुपने मंडल हे सन २००९ मध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात सामाविष्ट झाले. त्यापुर्वी या विभागाला स्वर्गीय विलासकाका यांनी भरभरून विकास निधी दिला आहे. त्यांच्याचप्रमाणे मीही या सुपने विभागात अनेक विकास कामे दिली आहेत, असे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले. हाच धागा पकडून उमेदवार उदयनराजे भोसले म्हणाले, स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर काका हे मोबाईलचा वापर करत नव्हते. पण त्यांनी गाव, वाडी, वस्तीमधील प्रत्येक सामान्य माणूस जोडून ठेवला. त्यांच्यानंतर आमचे मित्र अँड उदयसिंह पाटील दादा यांच्या पाठीमागे काकांनी जोडलेली माणसं आजही ठामपणेसोबत आहेत, ते त्यांनी केलेल्या कामाचं फलित आहे, असे उदयनराजे यांनी आवर्जून सांगितले.