आमदार निरंजन डावखरे यांनी केली सभास्थळाची पाहणी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले महाराज यांच्या प्रचारार्थ 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभास्थळाची आमदार निरंजन डावखरे यांनी महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी मनोज पांगरकर यांच्यासह पाहणी केली.
यावेळी सभेच्या ठिकाणी करण्यात आलेल्या नियोजनाची व सोयी सुविधांची माहिती डावखरे व पांगरकर यांनी घेतली. यावेळी किसान मोर्चा सरचिटणीस व सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, सातारा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, जिल्हा सरचिटणीस सागर शिवदास, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, मंडल अध्यक्ष शंकर शेजवळ, मंडल अध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, राजाभाऊ गरुड व भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.