शशिकांत शिंदेंना विजयी केल्यास साताऱ्याला दोन खासदार मिळतील ;जयंत पाटील यांचे मतदारांना आवाहन – changbhalanews
राजकिय

शशिकांत शिंदेंना विजयी केल्यास साताऱ्याला दोन खासदार मिळतील ;जयंत पाटील यांचे मतदारांना आवाहन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सध्या उदयनराजे भोसले हे राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे साताऱ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनाच भरघोस मतांनी विजयी करा, म्हणजे साताऱ्याला एक नव्हेतर दोन खासदार मिळतील असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील केले.

सातारा लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ केळघर (ता. जावळी) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. साताऱ्याचे मावळते खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. भारत पाटणकर, सदाशिव सपकाळ, दीपक पवार, सारंग पाटील, बापूराव पार्टे, विश्वनाथ धनवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या निमित्ताने कृषी संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या बैलगाडीतून जयंत पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

देशात आज हुकूमशाही प्रवृत्ती बळकट होत असून, नागरिकांचे अधिकार संकुचित होतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. तरी या हुकुमशाहीला लगाम घालण्याच्या निर्धाराने सर्वसामान्य जनतेनेच आता ही निवडणूक हातात घेतली असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
देशात आजस्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल, देशातील वंचित व दीनदलित लोकांचा आवाज जपायला हवा आणि त्यासाठी विरोधी पक्षांचा आवाज बुलंद केला पाहिजे. तरच देशात लोकशाही टिकेल असाही विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

देशातील जनता ही महागाई, बेरोजगारी तसेच विविध करांच्या जाचाने त्रस्त आहे. युवकांना बेरोजगार केले जात आहे. त्यामुळे केंद्रातील सरकार घालवण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करून लोकशाही बळकट करा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

खंडेरायाला श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ….
दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र पाल येथील श्री खंडोबा देवाला श्रीफळ वाढवून कऱण्यात आला. आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, उमेदवार आमदार शशिकांत शिंदे, डॉ. सुरेश जाधव, ॲड. रवींद्र पवार, डॉ. भारत पाटणकर, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, हर्षद कदम, सारंग पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close