ड्राय डे दिवशी कराड तालुक्यातील विंग येथे दारू विक्री 13 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त ; चौघांवर कारवाई. – changbhalanews
क्राइम

ड्राय डे दिवशी कराड तालुक्यातील विंग येथे दारू विक्री 13 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त ; चौघांवर कारवाई.

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी दारू विक्रीसाठी मनाई आदेश असताना कराड तालुक्यातील विंग येथे बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारू विक्री करणाताना आढळून आलेल्या चार जनावर सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कारवाई करून तब्बल 13 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी आज दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांचे जयंती निमित्त सातारा जिल्हयामध्ये दारु विक्रिस बंदी (ड्रायडे) असल्याने अशी विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांच्या कारवाई करण्याच्या सूचना अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या होत्या.

त्याप्रमाणे कारवाई करण्याकरीता अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार दिनांक १४/४/२०२४ रोजी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, विंग ता. कराड जि. सातारा येथील हॉटेल रॉयल लँडस्केप याठिकाणी चोरटी दारुची विक्री चालू आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सपोनि पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखालील पथकास सदर ठिकाणी जावून छापा कारवाई करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सपोनि सुधीर पाटील व त्यांच्या पथकाने आज दिनांक १४/४/२०२४ रोजी शिंदेवाडी विंग ता. कराड जि.सातारा येथील हॉटेल रॉयल लँडस्केप याठिकाणी दुपारी छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क पथक कराड यांचेसह कारवाई केली असून सदर ठिकाणी हॉटेल मालकाच्या सांगण्याप्रमाणे ३ इसम मा. जिल्हाधिकारी सो, सातारा यांचे दारु विक्री बंदी आदेशाचा भंग करुन विदेशी दारुची विक्री करीत असताना मिळून आले असून त्यांच्या कब्जात विदेशी दारु रॉयल स्टॅग, रॉमॅनो वोडका, व्हाईट मिसचिफ, डी.एस.पी. ब्लॅक, डॉ. ब्रँडी, ब्लेंडर प्राईड, मॅकडॉवेल नं. १ अशा वेगवेगळया कंपनीचा १३,११,२०४/- रुपयेचा विदेशी दारुचा माल व रोख रक्कम १२,६३०/- रुपये असा एकुण १३,२३,८३४/- रुपयेचा माल मिळून आला असून सदर इसमांवर कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.

श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सदर कारवाईमध्ये अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थागुशा सातारा, सपोनि सुधीर पाटील, पोउनि सचिन भिलारी, श्रेणी पोउनि तानाजी माने, सफौ. सुधीर बनकर, पोहवा साबीर मुल्ला, अतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, मंगेश महाडीक, सनी आवटे, शिवाजी भिसे, प्रविण कांबळे, मोहन नाचण, सचिन साळुंखे, राजु कांबळे, मनोज जाधव, लक्ष्मण जगधने, अरुण पाटील, केतन शिंदे, प्रविण पवार, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सचिन जगताप, नितीन येळवे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रीमती डॉ. उमा पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव, जवान विनोद बनसोडे, महिला जवान राणी काळोखे यांनी सहभाग घेतला.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close