दोन वर्ष तडीपार असलेल्या सराईतास कराड शहर डी. बी. पथकाने केली अटक – changbhalanews
क्राइम

दोन वर्ष तडीपार असलेल्या सराईतास कराड शहर डी. बी. पथकाने केली अटक

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दोन वर्ष तडीपार असलेल्या सराईत संशयितास कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मंगळवारी रात्री अटक केली आहे. साहील आलम मुजावर रा. 121. पालकरवाडा मंगळवार पेठ ता. कराड जि. सातारा, असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांकडील माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत हद्दपार संशयित साहील आलम मुजावर रा. 121. पालकरवाडा मंगळवार पेठ ता. कराड जि. सातारा व त्याचा साथिदार यांना पोलीस अधीक्षक सातारा यांनी दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी पासुन दोन वर्षासाठी सातारा तसेच सांगली जिल्हयातील काही तालुक्यातुन हद्दपार केले होते. तरी देखील साहील मुजावर हा हद्दपारच्या आदेशाचे उलंघन करुन कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील पालकरवाडा मंगळवार पेठ ता. कराड जि. सातारा येथे छुप्या स्वरुपात वावरत असल्याची गोपनीय माहिती कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक के.एन. पाटील यांना मिळाली होती. त्याबाबत त्यांनी पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील यांना माहिती देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकुळे, पोलीस कॉन्स्टेबल आनंदा जाधव यांनी तात्काळ सदर ठिकाणी रवाना होवन हद्दपार संशयित आरोपी साहिल मुजावर यास ताब्यात घेतले असुन त्याचेवर हद्दपार आदेशाचे उलंघन केलेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील, सफौ देसाई, सफौ देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, ओमत पवार, पोलीस नाईक कुलदिप कोळी, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी केली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close