पळवुन नेहणे व पोक्सो गुन्हयातील फरारी आरोपीस शिताफीने अटक
कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहर पोलीस ठाणे गु. र. नं. 1192/2023 भादंविसं. क. 363 मधील दिनांक 31.10.2023 पासुन फरारी आरोपी याने दिनांक 30.10.2023 रोजी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीस अमिष दाखवुन पळवुन नेलेचा गंभीर अपराध केला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीस कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफीने अटक केली.
याबाबत पोलिसांकडील माहिती अशी , कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पोलीस अंमलदार यांनी सदरहु गुन्हयातील फरारी आरोपीत बज्या उर्फ बजरंग सुरेश माने, रा. बुधवार पेठ, कराड ता. कराड याची गोपनीय बातमीदार तयार करुन माहीती काढणेचे प्रयत्न सुरु केला होता. दिनांक 02.04.2024 रोजी गोपनीय बातमीदाराकडुन प्राप्त खात्रीशीर बातमीप्रमाणे खातरजमा करता नमुद संशयित आरोपी बज्या माने हा कराड परीसरात येणार असलेची खात्रीशीर बातमी मिळालेने पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो. कॉ. आनंदा जाधव, महेश शिंदे यांनी कराड शहरालगत वारुंजीफाटा- पाटण रोड येथे सापळा रचुन थांबले असताना संशयिताला पोलीसांची चाहुल लागलेने तो पळुन जायचे तयारीत असतानाच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस अंमलदार पो. कॉ. आनंदा जाधव व पो. कॉ. महेश शिंदे यांनी त्यांस पाठलाग करुन शिताफीने पकडले. बज्या उर्फ बजरंग सुरेश माने, वय- 30 वर्षे. रा. बुधवार पेठ, कराड ता. कराड हा संशयित नमुद गुन्हे केलेपासुन फरार झाला होता.
सदर फरारी आरोपीस पकडणेची कामगिरी कराड शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदारांसह केली आहे. फरारी आरोपीची गोपनीय बातमी दारांकडुन माहीती मिळवुन तपासचक्र फिरवत कसोशीने माहीतीच्या आधारे महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरारी संशयित आरोपी बज्या उर्फ बजरंग सुरेश माने, रा. बुधवार पेठ, कराड ता. कराड यांस पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे सखोल तपास केल्यावर त्याने गुन्हा केलेची कबुली दिली असुन त्यांस अटक करणेस कराड शहर डी. बी. पथकाने यश मिळविलेले आहे. पुढील कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक सुभाष फडतरे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम, पोलीस
उपअधीक्षक अमोल ठाकुर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील व पोलीस अंमलदार स. फौ. रघुवीर देसाई, स. फौ. संजय देवकुळे, पो. हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पोलीस अंमलदार अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख , अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी कराड शहर पोलीसांचे याबद्दल अभिनंदन केले आहे.