पोहायला गेलेल्या पिता-पुत्राचा बुडून मृत्यू – changbhalanews
क्राइम

पोहायला गेलेल्या पिता-पुत्राचा बुडून मृत्यू

वाई तालुक्यातील आंबेदरा आसरे येथील घटना

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
धोम धरणाच्या बोगदा कालव्याच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना आंबेदरा आसरे (ता वाई) येथे मंगळवारी (दि. २) घडली. उत्तम सहदेव ढवळे (वय ४५) व अभिजीत उत्तम ढवळे (वय १२) अशी मृतांची नावे आहेत.

धोम धरणातून बलकवडी धरणाच्या आसरे गावाजवळच्या बोगद्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. परंतु सध्या कालवा बंद असल्याने तेथे गेट टाकलेले आहे. त्यामुळे येथे पाणी साठलेले
असते. या पाण्यात दुपारी पोहण्यासाठी उत्तम ढवळे व अभिजीत ढवळे हे दोघे पितापुत्र गेले होते. यावेळी कालव्याच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले.

सायंकाळी महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व वाई आपदा ट्रेकर्स टीमच्या सहाय्याने घटनास्थळी पाण्यात शोध मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. या दरम्यान शोध मोहीमेतील सदस्य अशुतोष शिंदे (वाई) यांच्या डोक्याला बोगद्यातील लोखंडी बार लागल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे. शेतकरी असलेल्या उत्तम ढवळे यांचा चिकनचा व्यवसाय होता. तसेच ते पट्टीचे पोहणारेही होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close