कराड दक्षिणचे कार्यक्षम नेतृत्व ; डॉ. अतुल भोसले (बाबा)
कराड दक्षिणचे विकासक, युवकांचे आयडॉल, कृष्णा बँकेचे चेअरमन, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष, भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी , कृष्णाकाठचे सर्वगुण संपन्न नेतृत्व डॉ. अतुल भोसले (बाबा) यांचा गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त….
एखाद्या माणसाची ओळख समाजाला त्याच्या कर्तुत्वाने होते. हे कर्तृत्व घडवण्याची किमया त्या व्यक्तीला, त्याच्याकडे असलेले आचार, विचार आणि त्याच्यावर झालेले संस्कार यातून साध्य होत असते. सहकार, राजकारण असा जनसेवेचा वारसा असलेल्या सहकार महर्षी जयवंतरावजी भोसले तथा आप्पासाहेब यांच्या कुटुंबातून पुढे आलेले डॉ. अतुलबाबा भोसले हे नव्या पिढीतील असेच एक कार्यक्षम कर्तृत्ववान नेतृत्व आहे. कुटुंबाचा वारसा तर आहेच आहे पण डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या व्यक्तिमत्त्वाला स्वकर्तुत्वाची मिळालेली जोड ही तितकीच महत्त्वाची आहे.
समाजमान्य होणारं नेतृत्व हे एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी अपारकष्ट, जिद्द, मेहनत, सतत समाजसेवेचा ध्यास आणि मिळालेली संधी सर्वोत्तम कामगिरीमध्ये बदलण्याची क्षमता त्याच्याकडे असावी लागते. युवा नेते डॉ. अतुलबाबा यांचा आजवरचा प्रवास पाहिला तर या बाबी त्यांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वातून वेळोवेळी ठळकपणे दिसून आल्या आहेत. य. मो. कृष्णा साखर कारखान्यापासून ते अनेक सहकारी संस्था डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या कुटुंबाने सांभाळल्या आहेत. उत्तम कामगिरी राखत त्या वाढवल्या आहेत. सहकारमहर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थासारख्या प्रतिथयश संस्थांची स्थापना करून डॉ. अतुलबाबांनी याची चुणूक कधीच दाखवून दिली आहे. ‘संस्था चालवाव्यात तर त्या कृष्णा परिवाराने’ असं महाराष्ट्रभर आवर्जून म्हटलं जातं ते उगाचच नाही. सहकार महर्षी जयवंतरावजी भोसले यांच्यानंतर डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या कार्यकुशलतेने कृष्णा परिवाराची घोडदौड अविरत सुरू आहे.
कृष्णा हॉस्पिटलकडून अखंडपणे रुग्णसेवा…
सातारा , सांगली जिल्ह्यात डॉ. अतुल भोसले यांचा मोठा जनसंपर्क आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषता सातारा व सांगली जिल्ह्यातील रुग्णांसाठी कृष्णा हॉस्पिटल वरदान ठरले आहे. कोरोना काळात या हॉस्पिटलचे महत्व अधोरेखित झाले होते. कृष्णा हॉस्पिटल नसते तर पश्चिम महाराष्ट्रातील मृत्यूचा आकडा कित्येक पटीने वाढला असता हे सर्वांनाच मान्य करावे लागते. डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यापासून डॉ. अतुलबाबांनी संपूर्ण कराड दक्षिणमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी शिबिरे आयोजित करून विनामूल्य कार्डस देण्याची व्यवस्था केली होती. आरोग्य सवलती मिळवताना त्याचा मोठा लाभ नागरिकांना होणार आहे.
कार्यक्षम नेतृत्वाला भाजपचे पाठबळ…
डॉ. अतुल भोसले यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून भारतीय जनता पक्षाने त्यांना पाठबळ देण्याचे सातत्याने काम केले आहे. पक्षाने त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, लोकसभा प्रभारी या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्षपद हे राज्यमंत्री दर्जाचे पदही पक्षाने त्यांना दिले होते.
वारकऱ्यांच्या दर्शन रांगेत सुमारे 8 किलोमीटरची ‘ग्रीन कार्पेट’ची व्यवस्था, दर्शनासाठी कार्तिकीपासून टोकन, चंद्रभागेचे वाळवंट स्वच्छ राहावे म्हणून स्वच्छता ठेकेदारांच्या नेमणुका, 350 खोल्यांचे सुसज्ज भक्त निवास , मंदिराचं मोबाईल अॅप लॉन्च करणे अशी कितीतरी कामे करून डॉ. अतुल भोसले यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थानचा कायापालट करून दाखवला. त्यांच्या या कामाचे कौतुक राज्यभरात झाले. पक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
2009 पासून डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या मात्र त्यांना अपेक्षित यश आले नाही. तरीही न थांबता अन् न थकता कराड दक्षिणच्या विकासासाठी ते अविरतपणे प्रयत्नशील राहिले आहेत.
भाजपच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकास निधी…
डॉ. अतुल भोसले यांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कराड दक्षिणच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यातून आजवर कराड शहरासह दक्षिण मधील विविध गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहेत. काही ठिकाणी उद्घाटनांचे तर काही ठिकाणी भूमिपूजनाचे नारळ फुटले असून कामे प्रगतीपथावर आहेत. याशिवाय ग्रामीण शेती अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बैलगाडा शर्यतींचे आयोजन, मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी कुस्ती आखाड्यांचे आयोजन, क्रिकेट लीग स्पर्धा, कृषी व धान्य महोत्सव , महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, महाविद्यालयीन युवक-युतीशी सुसंवाद, शेतकरी-उद्योजकांसाठी चर्चासत्रे असे कितीतरी उपक्रम डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये राबवले जात आहेत. युवकांमध्ये त्यांची क्रेझ आहे. उत्तम संघटन कौशल्य आणि तळागाळातल्या प्रश्नांची जाण असलेल्या या युवा नेत्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी-कोटी शुभेच्छा..!!
– हैबतराव आडके, ©® संपादक, चांगभलं.