तळमावले पीएचसीच्या माध्यमातून क्षयरोगाबाबत जनजागृती – changbhalanews
Uncategorized

तळमावले पीएचसीच्या माध्यमातून क्षयरोगाबाबत जनजागृती

चांगभलं ऑनलाइन | ढेबेवाडी प्रतिनिधी

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तळमावले (ता‌. पाटण) प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आला.

क्षयरोगाबाबत जनजागृती करुया व आपले गाव क्षयरोगमुक्त करण्यास मदत करुया, असे आवाहन यावेळी तालुका आरोग्य अधिकारी आर .बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पवार, डॉ नितीन वांगीकर यांनी केले.

दि. २४ मार्च हा दिवस तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात आला.‌ भारतात क्षयरोगाचे परिणाम अधिक आहे. दररोज ४० हजारांहून अधिक व्यक्तींना क्षयरोगाच्या जंतूंचा संसर्ग होतो. दररोज एक हजारपेक्षा जास्त रुग्ण क्षयरोगामुळे मरण पावतात.

प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले व उपकेंद्र गुढे , काढणे, कुंभारगाव, खळे येथे जनजागृती अभियानात दोन आठवडे पेक्षा जास्त खोकला असणाऱ्या , वजन कमी होणे, भुक मंदावणे मानेवर गाठ या प्रकारे लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तातडीने क्षयरोग तपासणी करून घ्यावी, या संदर्भात आरोग्य शिक्षण देण्यात आले . तसेच प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.

क्षयरुग्ण हे नवीन थुंकी दूषित असतात व उरलेले थुंकी अदूषित असतात. या नवीन थुंकीदूषित क्षयरुग्णांमधील साधारणतः सहा टक्के क्षयरुग्ण मृत्यू पावतात. नवीन क्षयरुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण ८५ ते ९० टक्के आहे. क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार असल्याने या आजाराचे जंतू कोणाच्याही शरीरात प्रवेश करु शकतात व क्षयरोग होऊ शकतो. क्षयरोग झाला म्हणून घाबरु नका. हा आजार सरकारी दवाखान्यात सहा ते आठ महिन्यांच्या उपचाराने बरा होतो. हा उपचार पूर्ण मोफत उपलब्ध असून प्रत्येक रुग्णासाठी सहा ते नऊ महिन्यांचे औषधोपचार अखंडित सुरु ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले. यावेळी तालुका STLS हणमंत यादव, Sts अभिजित गुजले , अमित जाधव पाटील मँडम , आरोग्य सहाय्यक शरद कांबळे , जामसिंग पावरा, औषध निर्माण अधिकारी दिपाली चव्हाण, समुदाय आरोग्य अधिकारी नितीन माने, अकबर मुल्ला , सुप्रिया यादव, धैर्यशील सपकाळ , आरोग्य सेवक रोहीत भोकरे, स्वप्निल कांबळे, विलास फाळके, आरोग्य सेविका रजना कुंभार , विद्या लोहार, सोनाली परीट, सुप्रिया पवार व तळमावलेच्या सर्व आशा सेविका गटप्रवर्तक वैशाली डुबल , कोमल महादर, निलम काजारी उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close