चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
महाविकास आघाडीमधील जागावाटपामध्ये शिवसेना (उबाठा) ठाकरे गटाला एकूण 22 जागा मिळणार असल्याचे वृत्त एका आघाडीच्या मराठी दुरचित्रवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबतच्या चर्चेने वेग घेतला आहे. महाराष्ट्रातील 22 जागा या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा) गटाला मिळणार असल्याचे दूरचित्रवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या जागावर पुढील दोन दिवसांत मतदारसंघासह उमेदवारांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंकडून केली जाणार आहे.
चार जागां वरचा निर्णय लांबणीवर….
शिवसेना उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत 22 जागा मिळणार आहेत, यामधील 4 जागांवरील उमेदवारांचा अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. यामध्ये जळगाव, कल्याण, पालघर, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवाय, हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते.
अशी आहे शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवारांची प्राथमिक यादी…
* जळगाव –
* बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
* यवतमाळ वाशीम – संजय देशमुख
* हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
* परभणी – संजय जाधव
* छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
* धाराशिव – ओमराजे निंबाळकर
* शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
* नाशिक – विजय करंजकर
* ठाणे – राजन विचारे
* कल्याण –
* पालघर –
* मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील
* मुंबई दक्षिण- अरविंद सावंत
* मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
* मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तिकर
* उत्तर मुंबई-
* रत्नागिरीसिंधुदुर्ग – विनायक राऊत
* रायगड – आनंद गीते
* सांगली – चंद्रहार पाटील
* मावळ – संजोग वाघेरे
* हातकणंगले – राजू शेट्टी (स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा )