मोदींनी जनतेच्या मतदानाच्या कर्जाची व्याजासहित परतफेड केली-चंद्रशेखर बावनकुळे. – changbhalanews
राजकियराज्य

मोदींनी जनतेच्या मतदानाच्या कर्जाची व्याजासहित परतफेड केली-चंद्रशेखर बावनकुळे.

ग्राम परिक्रमा अभियानाचा सांगता समारंभ

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
भारत देशातील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवून केलेल्या मतदानाच्या कर्जाची मोदींनी लोककल्याणाच्या विविध योजना राबवून व त्याचा लाभ लोकापर्यंत पोहोचवून व्याजासहित परतफेड केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ते दिवसाचे अठरा तास कष्ट घेत आहेत. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ते बेलवाडी ता. कराड येथे ग्राम परिक्रमा अभियानाच्या सांगता समारंभात बोलत होते. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे. महामंत्री विक्रांत पाटील. प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मसूर या ठिकाणाहून 12 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या पश्चिम महाराष्ट्र ग्राम परिक्रमा अभियानाची सांगता बेलवाडी ता. कराड येथे बुधवारी संपन्न झाली. या ग्राम परिक्रमेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती गावागावातील लोकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. ही यात्रा पूर्ण झाल्याने त्याची सांगता बेलवाडी येथे करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले मोदी सरकारच्या योजनेचा सर्वाधिक फायदा हा महाराष्ट्राला होत आहे.

किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता त्यांनी जनतेच्या खात्यावर जमा केला आहे. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने आकडेवारी सहित राबवलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवलेल्या नाहीत. उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी हे फक्त मोदींवर टीका करण्याचे काम करतात. संपूर्ण देश हाच मोदींचा परिवार आहे. किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी ग्राम परिक्रमा योजनेचा हेतू सांगितला. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना 6000 रुपये किसान सन्माननिधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या योजनांची आकडेवारी आपल्या भाषणातून सांगितली. दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान वाढवून देण्यात आले आहे.इथेनॉल, एफ. आर. पी., एम. एस. पी. याबाबतची माहिती त्यांनी दिली. यावेळी विक्रांत पाटील यांनी सांगितले की 2014 पूर्वीचा भारत आणि 2014 नंतरचा भारत यामध्ये प्रचंड फरक पडलेला आहे भारत आता जगामध्ये विश्वगुरू म्हणून ओळखला जात आहे मोदींनी देशाची मान जगामध्ये उंच केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विमा योजना सुरू करून कृषी संकटापासून शेतकऱ्यांची मुक्ती केली आहे. या कार्यक्रमात पुढे धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण वेताळ यांनी केले. प्रस्ताविकामध्ये त्यांनी कराड उत्तर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मागण्या, दुष्काळी परिस्थिती, पाणी योजनांचे हेड वाढवणे. पाणी योजना तातडीने पूर्ण करणे या अडीअडचणी सांगितल्या. त्याचबरोबर विद्यमान आमदारांच्या नाकर्तेपणामुळे मतदार संघ कसा मागे राहिला याबाबतची माहिती दिली. योजना पूर्ण करण्यासाठी बावनकुळे साहेबांनी मदत करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाला कराड उत्तर मतदारसंघातून त्याचबरोबर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातून किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. तर कराड उत्तर मधून पदाधिकारी कार्यकर्ते मतदार महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सातारा लोकसभा समन्वयक व किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते व अमर साबळे यांनी केले. तर आभार माजी कृषी सभापती भीमराव पाटील यांनी मानले.

यावेळी सरचिटणीस मकरंद कोर्डे, रंगनाथ साळुंखे, संदीप गिड्डे पाटील, उपाध्यक्ष राजेश मोरे,शशिकांत देशमुख, दादासाहेब सातव, पृथ्वीराज पवार,सुशांत निंबाळकर,सचिव मनोज कासवा,भगवान काटे,माऊली हळवणकर,सदस्य विश्रांती भसनळ,रामदास शिंदे,केशव कामटे, सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय पवार, मावळचे अध्यक्ष सचिन मचाले,पुणे उत्तरचे अध्यक्ष तानाजी थोरात सांगली जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड जिल्हा किसान मोर्चा समन्वयक सूर्यकांत पडवळ माजी पं. स. सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, उपाध्यक्ष सुरेश पाटील, महिला नेत्या दिपाली खोत, रुक्मिणी जाधव, अंजली जाधव, सीमा घार्गे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश गायकवाड, तालुकाध्यक्ष शंकर शेजवळ, प्रशांत भोसले,सुनील काळभोर, महेश जाधव, तुकाराम नलवडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी जय हनुमान करियर अकॅडमी चे मैदान मोफत उपलब्ध करून दिले होते.

महिलांची प्रचंड उपस्थिती।
आज झालेल्या सांगता सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. संपूर्ण मैदान पूर्ण क्षमतेने भरले होते. या मैदानामध्ये रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू असूनही 40% पेक्षा जास्त महिला उस्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. महिलांची उपस्थिती सर्वांच्या नजरेत भरण्यासारखी होती. कराड उत्तर मधील कोणत्याही सभेपेक्षा आजच्या सभेला महिलांची गर्दी उपस्थितीचे रेकॉर्ड मोडणारी होती.

शेतकरी हिताच्या योजना पोहोचवण्यासाठी 24×7 उपलब्ध.

नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी व मतदार संघातील सर्व पाणी योजना पूर्ण करण्यासाठी भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून कायम सक्रिय राहणार आहे. शेतकरी हिताच्या योजना राबवण्यासाठी 24 बाय सात लोकांसाठी उपलब्ध आहे.
रामकृष्ण वेताळ. प्रदेश सरचिटणीस, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close