पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली बुलेटच्या गतीने रेल्वेचा विकास.. रामकृष्ण वेताळ – changbhalanews
राजकियराज्य

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली बुलेटच्या गतीने रेल्वेचा विकास.. रामकृष्ण वेताळ

अमृत भारत योजने अंतर्गत अंडरपासचे उद्घाटन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाली गेल्या दहा वर्षांत रेल्वेचा मोठा विकास झाला आहे. आपल्या विभागात अनेक ठिकाणी अंडर ब्रीज ओव्हर ब्रीज तसेच रेल्वे दुहेरीकरणाच्या माध्यमातून दळणवळणाची सुलभता वाढली आहे. स्थानिक अंडरपासच्या माध्यमातून कोपर्डे हवेली, वडोली निळेश्वर, पार्ले येथील शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थी व वसतीगृहात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली बुलेटच्या गतीने रेल्वेचा विकास झाला आहे. अशी माहिती भाजपाचे सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ यांनी दिली ते अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत पार्ले येथील गेट क्रमांक ९८ अंडरपासचे औपचारिक उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाचशे चोपन्न रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास व पंधराशे रोड ओव्हर ब्रीज व अंडरपासचे व्हिडिओ काॅन्फरन्सव्दारे भूमीपुजन उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलवडे, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, शंकरराव शेजवळ, उमेश महाडिक, अश्विनी मदने, मोहन पवार, सीमा घार्गे, एम. बी. चव्हाण, शरद चव्हाण, तुकाराम नलवडे, रणजित थोरात, रेल्वेचे अधिकारी एस. एस. पिल्लई, आर. एम. गरवारे, बी. पी. आडूळकर, राहुल कुमार, नागेश ताटे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना वेताळ म्हणाले, युरोप, चीन बरोबरच आता भारत देखील रेल्वे मध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. लवकरच वंदे भारत रेल्वे कोल्हापूर मुंबई या ट्रॅकवरून धावताना दिसेल तसेच सातारा पंढरपूर रेल्वे सुरू होईल. या कामात रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. भविष्यात अडचणी येणार असल्या तरी रेल्वेचे अधिकारी आणि भाजप वरिष्ठांच्या माध्यमातून सोडवण्यात येतील.

यावेळी सचिन नलवडे म्हणाले, याठिकाणी रेल्वे गेटमुळे मोठा खोळंबा होत होता. शेतीमालाची वाहतूक करताना अडचणी येत होत्या. अंडर ब्रीज मुळे हा प्रश्न सुटला असला तरी काही प्रश्न निर्माण झाले होते ते प्रश्न देखील रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून सुटले. सध्या विकासाला प्राधान्य देणारे सरकार आहे त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांना कसा होईल हे रेल्वे प्रशासनाने लक्ष घालून जास्तीची कामे करुन घ्यावी. रेल्वे दुहेरीकरणा नंतर शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न उद्भवणार असून तो सोडवण्यासाठी स्थानिक शेतकरी व रेल्वे प्रशासनाने सोडवावा.

यावेळी रेल्वेच्या माध्यमातून स्थानिक शाळेमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. एम. यांनी केले.

रेल्वे प्रशासनाची ग्वाही…
रेल्वे दुहेरी करणानंतर शेतकऱ्यांच्या ऊस वाहतूकीसह रहदारीचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close