विविध जिल्हयातुन मोटर सायकल चोरी करणारा सराईत चोरटा कराड शहर डीबीच्या जाळयात – changbhalanews
क्राइम

विविध जिल्हयातुन मोटर सायकल चोरी करणारा सराईत चोरटा कराड शहर डीबीच्या जाळयात

एकुण 5 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 8 मोटर सायकल जप्त

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध जिल्हयातुन मोटर सायकल चोरी करणारा सराईत चोरटा गजाआड करत त्याच्याकडील 5 लाख 30 हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या 8 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. विक्रम रमेश सकट वय 27 वर्षे रा. बेघर वस्ती सैदापुर कराड ता. कराड जि. सातारा असे याप्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांकडील माहिती अशी, पोलीस अधीक्षकश् समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर सो. यांनी क्राईम मिंटीग मध्ये कराड शहरात तसेच उप नगरात होणान्या मोटर सायकल चोरीबाबत विशेष आढावा घेवुन कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना मोटर सायकल चोरीच्या गुन्हयाचा तात्काळ छडा लावणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी व्युव्ह रचना तयार केली. आणि सदर कारवाईस मोठे यश मिळुन कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेने सैदापुर तसेच जिल्हयातील विविध भागातुन चोरी झालेल्या एकुण 8 मोटर सायकलसह एक आरोपीच्या मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या.

पोलीस उप शनिरीक्षक पतंग पाटील यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन गट करुन कराड शहर तसेच उप नगरात गस्त सुरू केली होती. सायकांळी 5.30 वाजताचे सुमारास सैदापुर परिसरात गस्त करीत असताना एक इसम संशयीत रित्या मोटर सायकलवर उभा असलेला दिसुन आला. पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याचे ताब्यातील मोटर सायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. विक्रम रमेश सकट वय 27 वर्षे रा. बेघर वस्ती सैदापुर कराड ता. कराड जि. सातारा असे त्याने त्याचे नाव असल्याचे सांगितले. सदर आरोपीस पोलीस ठाणेस आणुन पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील यांनी त्यांचे तपास कौशल्याचा वापर करुन डी.बी. पथकाचे मदतीने सदर आरोपीकडुन सातारा, सागंली, कोल्हापुर जिल्हयातुन चोरी झालेल्या एकुण 8 मोटर सायकल हस्तगत करून जप्त केल्या. याप्रकरणी विक्रम रमेश सकट यास पोलिसांनी अटक केली.

संशयित संकट याने कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून 2,
कोरेगाव पोलीस ठाणे , हुपरी ठाणे (कोल्हापुर), जयसिंगपुर ठाणे, पुसेगाव पोलीस ठाणे , विश्रामबाग पोलीस ठाणे, तळबीड टोल नाका येथुन प्रत्येकी एक मोटर सायकल चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील, सहा.फौजदार रघुवीर देसाई, सहा. फौजदार संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे. महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close