‘तू मला आवडतेस, मैत्री करायची आहे…!” म्हणून अल्पवयीन मुलीला धमकावणाऱ्या युवकाला सहा महिने सक्तमजुरी ; १४ हजार दंड
कराड न्यायालयाचा निकाल
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीने स्पष्ट नकार दिला असतानाज्ञव ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने ‘तुझ्याशी मैत्री करायची आहे, तू मला आवडतेस’ असे म्हणून तिला स्नॅपचॅट वर हाताचे मनगटाजवळ कापलेले फोटो पाठवून भीती दाखवून व स्वतःचे जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देत तसेच मोबाईल वरती काढलेले तिचे फोटो स्क्रीनशॉट मारून लज्जा उत्पन्न करणारे स्क्रीन शॉट ठेवून वायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोषी धरून कराड न्यायालयाने युवकास विविध कलमान्वये दोषी धरून सहा महिने सक्तमजूरी व एकूण 14 हजार रूपये दंड ठोठावला.
प्रवीण अरुण चव्हाण वय 24 वर्षे राहणार वारुंजी , तालुका कराड असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. स्टेशन रोड येथे जुलै 2022 मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास कराड शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याचात सरकारी आर डी परमाज यांनी 5 साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी हवालदार एस. व्ही. खिलारे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, बाल लैंगिक अत्याचार कायदा व भा द वि स कायदा कलम 354 (D) नुसार आरोपी प्रवीण अरुण चव्हाण याला दोषी धरून सहा महिने सक्तमजूरी व एकूण 14 हजार रूपये दंड ठोठावला.